वर्धा : कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या चांगलेच सुन्न झाले आहे. कारण गावातील उमलत्या कळ्या गळून पडल्यात. गावातील हर्षल बाबा वाघाडे या बावीस वर्षीय युवकाने सतरा वर्षीय मुलीला बावीस जानेवारीस पळवून नेले होते. मुलीचा शोध न लागल्याने मुलीच्या घरच्यांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तळेगाव पोलिसांकडे केली. पोलीस तपासास लागले. मात्र ३ फेब्रुवारीला पार्डी येथील गणेश रंगारी यांच्या शेतातील विहिरीत दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आले.

हेही वाचा – नागपूर : धक्कादायक ! तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून देहव्यापार

Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या
badlapur, Kidnapping, Murder, Nine Year Old Boy, goregaon village, ambernath taluka, police, thane, crime news, marath news,
नऊ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या, अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव येथील घटना

हेही वाचा – नागपूर : फुल व्यापाऱ्याच्या घरात घुसले दरोडेखोर; वृद्धेच्या गळ्यावर चाकू लावून…

गावच्या पोलीस पाटलांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. ओळख पटविण्यासाठी बेपत्ता जोडीची माहिती घेतल्या गेली. तेव्हा ओळख पटली. दोघांनी पायाला ओढणी बांधून विहिरीत उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह कुजलेले असल्याने नातेवाईकांच्या उपस्थितीत जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. ठाणेदार संदीप धोबे पुढील तपास करीत आहे.