बनावट देयक सादर करून करचोरी

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर देशात करचोरीवर अंकुश बसेल असा केंद्र सरकारचा दावा होता. मात्र या दाव्याची नागपूरच्या काही कंपन्यांनी पार वाट लावली आहे. नागपुरातील चार मोठय़ा उत्पादन क्षेत्रातील कंपन्या बनावट देयक सादर करून करचोरी करत असल्याचे समोर आले आहे. या चारही कंपन्या जीएसटी गुप्तचर विभागाच्या रडावर असून लवकरच त्यांच्यावर कारवाईची दाट शक्यता आहे.

मेसर्स न्यू एज फॉल्स सििलग प्रा. लिमिटेड कंपनीने ४.६२ कोटींचा आíथक घोटाळा केल्याचे जीएसटीच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक पवन विनोद लालला यास शहरातील पहिली अटक झाली होती. कंपनीचा मालक मनोज गुप्ता फरार होता. ही घटना ताजी असतानाच नागपूरच्या जीएसटी गुप्तचर विभागाने आता अशा बनावट देयक सादर करून सरकारला कोटय़वधी रुपयांचा चुना लावणाऱ्या लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच नागपुरातील दहा कंपन्या संशयाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. यापकी चार कंपन्यांचे जाळे मोठे असल्याने जीएसटी गुप्तचर विभागाने त्यांच्या प्रत्येक आíथक व्यवहाराची तपासणी सुरू केली आहे. जीएसटी विभागाच्या ज्येष्ठ आधिकाऱ्यांनी या माहितीस दुजोरा दिला. लवकरच दोषींवर अटक कारवाई केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही कंपन्या उत्पादन क्षेत्राशी जुळल्या आहेत. केवळ कागदावर उत्पादन आणि कोटावधींचा व्यवहार झाल्याचे दर्शवतात. तसेच बॅलेन्सशीटमध्ये मोठी उलाढाल दाखवून बँकेतून मोठे कर्ज मिळवतात व नंतर ते बुडवतात. या दहापकी काही कंपन्यांनी याच बनावट उलाढालीच्या बळावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्येही आपली नोंदणी केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी असा प्रकार व्यापाऱ्यांमध्येच आढळत होता. मात्र आता उत्पादन कंपन्या देखील बनावट व्यवहार करीत आहेत. हा यांचा उपव्यवसाय झाला आहे. यापकी काही कंपन्यांचा आम्ही तपास सुरू केला असून लवकरच दोषींवर अटक करवाई करण्यात येईल, अशी माहिती  जीएसटी गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.