नागपूर : महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या चार राज्यातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात हिवतापासह किटकजन्य आजार नियंत्रणाचा नवीन फाॅम्युला तयार केला आहे. त्यानुसार नवीन माणक प्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नागपुरातील हाॅटेल प्राईड येथे चारही राज्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यात नवीन माणक प्रणालीवर एकमत झाले. बैठकीला आरोग्य विभागाच्या पूणे कार्यालयातील सहसंचालक डॉ. बबीता कमलापूरकर, नागपुरातील आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर आणि इतरही चारही राज्यातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत किटकजन्य आजाराची उच्च जोखीम असलेल्या भागात आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी समन्वय वाढविणे आणि धोरणे मजबूत करण्याचा निर्णय झाला.

बैठकीत नवीन माणक प्रणालीनुसार चारही राज्यातील इतर राज्यात जनतेच्या स्थलांतरासाठी मार्ग्दर्शक सुचना कार्यान्वीत करणेवर एकमत झाले. त्यानुसार चारही राज्यातून एक- मेकांच्या राज्यात स्थलांतरीत होणापूर्वी कामगार, भटकी जमातीसह नागरिकांची माहिती एक मेकांना देत त्यांची हिवताप तपासणी करणे, स्थानांतरीत झालेल्या व्यक्तींचीही तपासणी करणे. त्यात कुणाला हिवताप वा किटकजन्य आजार आढळल्यास तातडीने त्यावर उपचार करण्याचा निर्णय झाला. दरम्यान या कामगारांवर लक्ष ठेवत कुणाची प्रकृती बिघडल्यास त्यावरही विशेष लक्ष ठेवण्यावर एकमत झाले.

आवश्यकतेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण तथा क्षमता बांधणी करणे, राज्य सीमावर्ती भागातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात किटकजन्य आजारासह हिवतापाबाबत जनजागृती करणे, गंभीर किटकजन्या आजाराचे प्रामुख्याने हिवतापाच्या रुग्णाच्या उपचाराचे व्यवस्थापन करणे, राज्य सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करणे, विविध शासकीय, निमशासकीय विभागाशी तसेच सामाजीक संस्था, सेवाभावी संस्था यांची योग्य पध्दतीने समन्वयाने मदत घेणे, आप- आपलया राज्यातील स्थानिक हिवतापाचा प्रसार थांबवा आणि हिवतापाचे रुण्ग शुन्यावर आणण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे, सीमापार अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चीत करण्याचाही मुद्दा नवीन माणक प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आला. बैठकीत वर्ष २०२७ पर्यंत एकत्रित प्रयत्नांनी मलेरिया निर्मूलन साध्य करण्यासाठी ही बैठक खूप महत्त्वाची ठरणार असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त केले गेले. त्यामुळे आता महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या चार राज्यात या नवीन माणक प्रणाणीची अंमलबजावणी कशी होणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागाचे म्हणणे काय?

“हिवतापाचा दुषीत स्थानांतरीत झालेला कामगार वा नागरिकाला डासाने चावा घेऊन इतरांना चावा घेतल्यास या ाजाराचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे नवीन माणक प्रणालीवर काम करून या आजारावर नियंत्रणाचा प्रयत्न आहे, अशी माहिती आरोग्य सेवा किटकजन्य आजार विभागाच्या सहसंचालक डॉ. बबीता कमलापूरकर यांनी दिली.