प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : शरद पवार गटाने विदर्भात मागितलेली एकमेव जागा म्हणजे वर्धा होय. उशीरा जाग आलेल्या काँग्रेसने मग आम्हीच लढणार म्हणून निकराची लढाई सुरू करीत अमर काळे यांचे नाव पुढे केले. त्यावर राष्ट्रवादीने आमच्यातर्फेच लढा असा पेच टाकला.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

हा पेच सुटेल अशी शक्यता एक कारण देत व्यक्त केल्या जाते. अमर काळे यांच्या अर्धांगिनी असलेल्या मयुरी काळे यांचे माहेर मोठे राजकीय प्रस्थ आहे. केंद्रात तब्बल अठरा वर्ष कृषिमंत्री राहलेले अण्णासाहेब शिंदे हे मयुरा ताईंचे आजोबा.

आणखी वाचा- यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ९६ गावांना फटका; एकाचा मृत्यू, १२ जनावरे दगावली

अण्णासाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक शिंदे यांच्या त्या कन्या आहेत. देशाच्या हरित व धवल क्रांतीत मोठे योगदान राहलेल्या आजोबांचा वारसा मयुरा काळे यांनी सासरी आल्यावर आर्वीत जोपासला. शिंदे फॉउंडेशनचे काही शेतकरी पूरक प्रकल्प त्यांनी आर्वी परिसरात सुरू केले. या फॉउंडेशनची एक बैठक काही महिन्यापूर्वी पुणे येथे संपन्न झाली. या फॉउंडेशनचे विश्वस्त कोण, तर शरद पवार. त्यांनी आर्वी प्रकल्पस मंजुरी देत अनुदान लागू केले. तर पवार व्हाया शिंदे आणि काळे असा धागा आज आठविल्या जातो. त्या नात्याने काळे यांना पवार दारी जावयाचा मान आहे. म्हणून अमर काळे व मयुरी काळे आज पवारांना भेटले तेव्हा आस्थेने विचारपूस झाली.

काँग्रेसला जागा सोडायची नाही, काँग्रेस नेताच आपला उमेदवार करायचा, असा व्युह राहू शकत असल्याची चर्चा होते. प्रसंगी अमर यांनी असमर्थता दर्शविली तर मयुरा काळे या लोकसभेच्या वर्धेतील आघाडीच्या उमेदवार बनू शकतात. काळे यांनी यावर भाष्य टाळले. आता जावयाचा पेच पवार कडा सोडविणार, हे पुढेच दिसेल.