अकोला : राज्यातील गोवंशीय पशुधनात ‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा आढळून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५० टक्केच पशुधनाचे लसीकरण झाले. उर्वरित लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. ‘कॅप्रिपॉक्स’विषाणूमुळे रोगाचा संसर्ग होत असून ‘लम्पी’चा धोका पुन्हा वाढला आहे.

राज्यात काही ठिकाणी पशुधनात ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख ३३ हजार २७१ गोवंशीय पशुधन आहे. त्यातील एक लाख १६ हजार ३८५ पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ‘लम्पी’ संसर्ग ‘कॅप्रिपॉक्स’मुळे होत असून या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू देवी गटाचे असतात.

prisoners to be released from pakistan custody
पाकिस्तान कैदेतून सुटका होणाऱ्या ३५ कैदींमध्ये डहाणू मधील पाच खलाशांचा समावेश
Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…

हेही वाचा – अकोला : तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल; ११,५०० चा टप्पा ओलांडला, कारण काय वाचा…

‘लम्पी’चा प्रसार जनावरांना डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यापासून होतो. गोवर्गीय सर्व वयाच्या जनावरांना हा आजार होऊ शकतो. जनावराच्या शरीरावर कडक व गोल गाठी येतात. जनावरे चारा कमी खातात अथवा बंद करतात. पाणी पिण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. बाधित जनावरांना सुरुवातीस मध्यम स्वरुपाचा ताप येतो. डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव वाहतो, सर्व अंगावर गाठी येऊ लागतात. या गाठी विशेषत: डोके, मान, पायावर येतात. जनावरातील दूध उत्पादन क्षमता अत्यंत कमी होत जाते. काही जनावरांच्या पायावर सूज येते.

जनावरांच्या फुप्फुस, श्वासनलिका, अन्न नलिकेवर मोठ्या प्रमाणात पुरळ येतात. दरम्यान, जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पशुसंवर्धन यंत्रणेला दिले आहेत. पशुपालकांनी काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तात्काळ ताप मोजावा. बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपापासून विलग ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरास गावातील चराऊ कुरणावर इतर निरोगी जनावरांसह सोडू नये.

हेही वाचा – गडचिरोली : पोलीस बंदोबस्तात पं. दीनदयाळ अध्यासनाचे उद्घाटन; कार्यक्रम रद्द करण्यासाठी संघटनांचे भरपावसात आंदोलन

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने डास, माश्या, गोचिडसारख्या कीटकांवर औषधांचा वापर करून त्यांचा नायनाट करावा. निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येवू नयेत म्हणून त्यांच्या अंगावर औषध लावावे व गोठ्यामध्ये कीटकनाशक फवारणी करावी. आजारी व निरोगी जनावरांवर औषध फवारणी करू नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारांमध्ये नेऊ नये. बाधित जनावराच्या गाठीचे रुपांतर जखमेत झाल्यास जखमेत जंतूसंसंर्ग होऊ नये यासाठी जखमेवर औषधी लावावी.

पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक असल्याचे प्रशाासनाकडून सांगण्यात आले आहे.