अकोला : राज्यातील महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अकोल्यात चक्क पुरुषांनी अर्ज दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला. या योजनेची नोंदणी अद्यापही सुरूच आहे. या योजनेच्या लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक महिलेची धडपड सुरू आहे. अकोल्यात मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी एक नवीनच प्रकार समोर आला आहे. लाडक्या बहीण योजनेच्या लाभासाठी चक्क लाडके भाऊ देखील रांगेत लागले होते.

हे ही वाचा…अमरावती : “आम्हाला शिकवू द्या, शाळा बनल्या उपक्रमांच्या प्रयोगशाळा”; शिक्षकांचा उस्फूर्त मोर्चा

नारी शक्ती दूत ॲपवर खोटी माहिती देत अर्ज

शहरातील सहा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर खोटी माहिती देत अर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल केले. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू असतांना हा गंभीर प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला. अर्ज दाखल करतांना सहा पुरुषांनी खोटी कागदपत्रे जमा केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सहा पुरुषांवर कारवाई, खुलासा देखील मागवला

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सहा पुरुषांवर महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या या सहा पुरुषांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्या सहा पुरुषांचे आधार कार्ड निलंबित करण्यात आले आहे. या सहा पुरुषांना आधारकार्डद्वारे आता कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच त्यांच्याकडून या प्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिली.

हे ही वाचा…बुलढाणा : ‘कंत्राटी भरती नकोच’; शिक्षकांचे शक्तिप्रदर्शन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडक्या बहिणींना अर्ज दाखल करता येणार

राज्यातील महत्त्वाकांची लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाडक्या बहिणींना अर्ज दाखल करता येणार आहे. पात्र महिलांचा अर्ज भरणे बाकी असल्यास त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल केला, मात्र त्यात त्रुटी असलेल्या महिलांना देखील त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाद्वारे देण्यात आली. या योजनेचा तिसरा हप्ता देखील लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे.