भंडारा : भजनाचा कार्यक्रमात आटोपून गावाकडे परतत असलेल्या भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात पडल्याने झालेल्या अपघातात १३ जण किरकोळ जखमी झाले असून दोन चिमुकल्या मुली मात्र नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव मार्गावरील वडगाव नाल्यावर आज पहाटे ही घटना घडली.

हेही वाचा : मेट्रोचे उद्घाटन, पाऊस अन् मोदींचा दौरा रद्द; जे नागपुरात घडले होते तेच पुण्यात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साकोली तालुक्यातील खांबा येथील १३ जणांचे भजनी मंडळ ताज मेहंदी बाबाच्या कार्यक्रमासाठी भीवखिडकी येथे गेले होते. २६ रोजी रात्री भजन आटोपल्यानंतर १७ च्या पहाटे गावाकडे परतत असताना पहाटे पाच वाजताच्या सुमारास जांभळी वडेगाव मार्गावरील वडेगाव येथील नाल्यात टेम्पो पडला. दोन लहान मुलींसह १३ जण या वाहनात होते. या घटनेत पाच आणि सात वर्षाच्या दोन लहान मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. इतर १३ जण किरकोळ जखमी असून सुखरूप बाहेर पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि आणि साकोलीचे पोलीस पथक मदतीसाठी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने टेम्पो नाल्यातून बाहेर काढण्यात आला. एनडीआरएफ च्या पथकाच्या माध्यमातून वाहून गेलेल्या दोन मुलींचा शोध घेणे सुरू होते. घटनेची माहिती होतात गावकऱ्यांचा लोंढा घटनास्थळाकडे मदतीसाठी धावला होता. वृत्त लिहेस्तोर मुलींची नावे कळू शकली नव्हती.