बुलढाणा : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे अनिल तुपकर तर उप सभापतीपदी भाजपाचे विष्णू मेहेत्रे यांची आज बिनविरोध निवड झाली. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. बाजार समितीच्या १८ सदस्यीय संचालक पदाच्या निवडणूकीत आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनेलने सर्व जागा जिंकून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता.

हेही वाचा : “मी प्रश्न अदानींना विचारले, की उत्तर त्यांचे चमचे…”, उद्धव ठाकरेंची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीचे १० तर शिवसेना (शिंदे गट) व भाजपचे प्रत्येकी ४ संचालक निवडून आले होते. यामुळे सभापती राष्ट्रवादीचाच होणार हे उघड होते. आज सोमवारी बाजार समितीत झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सभापती तर भाजपला उपसभापती पद देण्यात आले. अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक सुरेखा शितोळे यांनी सभापतीपदी तुपकर तर उपसभापतीपदी मेहेत्रे यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.