बुलढाणा : मोताळा तालुक्यातील रोहिणखेडजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तीन मित्र एकाच दुचाकीवर (एम.एच २८ बी. एन ९६२९) बसून मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे गावाकडे जात होते. दरम्यान, रोहिणखेड स्थित बारागाव पाणी पुरवठा योजनेच्या टाकीजवळ दुचाकी रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडाला धडकली. यामुळे दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे करीत आहे.