नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात पर्यटकांमध्ये वाघाला पाहण्यासाठी जणू स्पर्धा लागली असते. अशावेळी वाघ नेहमीपेक्षा वेगळे वागताना दिसला तर पर्यटकांची लॉटरी लागलीच म्हणून समजा. या व्याघ्रप्रकल्पाच्या कोळसा क्षेत्रात झरीपेठ-केसलाघाट दरम्यान सकाळीसकाळी ‘के मार्क’ही वाघीण पर्यटकांना आळोखेपिळोखे देताना दिसली. जणू ती सातत्याने पर्यटकांना दर्शन देऊन कंटाळली होती आणि मातीत लोळत होती. ‘डेक्कन ड्रिफ्ट’ चे पीयूष आकरे यांनी हा व्हिडिओ लोकसत्ता ला उपलब्ध करून दिला.

उन्हाळ्याच्या दिवसात कडकडीत उन्हात जेथे माणसांनाच कोणतीही गोष्ट करताना आळस येतो, तिथे वाघांनाही तो येणारच. कारण त्यांच्या अधिवास क्षेत्रात सातत्याने पर्यटकरुपी माणसाची लुडबुड चालली असते. तो सुद्धा सातत्याने त्याच्या अधिवासात लुडबुड करणाऱ्या पर्यटकांना कंटाळलेला असतो. ‘के मार्क’ या वाघिणीलाही हाच अनुभव आला. तिलाही पर्यटकांची ही सततची लुडबुड नकोशी झाली आणि ती मग निवांत ठिकाणी पहूडली. अक्षरश: आळोखेपिळोखे देत जणू त्रागा व्यक्त करु लागली.

mumbai, Sea Coast Road,
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल
Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

हेही वाचा…नागपूरच्या ज्ञानयोगीसाठी प.महाराष्ट्रातील युवा आमदाराचा पुढाकार , काय आहे मागणी

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘माधूरी’ नावाची एक प्रसिद्ध वाघीण होती. तर ‘खली’ नावाचा वाघही तेवढाच प्रसिद्ध. या दोघांचे अपत्य म्हणजेच ‘के मार्क’ वाघीण. ताडोबाच्या केसलाघाट पर्वतरांगाभोवती तीचा अधिवास. ती देखील आई झाली आहे आणि बछड्यांना तीने जन्म दिला आहे. ‘के मार्क’ ही वाघीण अतिशय धाडसी म्हणून ओळखली जाते. तेवढीच ती सुंदर देखील आहे. या वाघिणीने दक्षिण ताडोबाच्या केसलाघाट आणि झरीपेठ जंगलावर आपली हुकूमत स्थापन केली आहे.

हेही वाचा…वर्धेतून काँग्रेसच लढणार; कोणी दिली ही हमी? वाचा सविस्तर…

अतिशय जोखमीच्या अशा वनक्षेत्रात ‘के मार्क’ वाघीण राहते. कारण तिच्या अधिवासातून राष्ट्रीय महामार्ग जातो. अनेकदा ती हा महामार्ग ओलांडताना दिसून आली आहे. तर हिवाळ्यात ती बरेचदा या राष्ट्रीय महामार्गावरुन बराच लांब अंतरापर्यंत मार्गक्रमण करतानासुद्धा दिसून आली आहे. त्यामुळे जंगलात पर्यटनासाठी जाणारे पर्यटकच नाही तर या महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनाही ती दर्शन देत असते. तिच्या अधिवास क्षेत्रात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील प्रसिद्ध वाघ ‘मोगली’चा लहान मुलगा ‘छोटा मोगली’ आणि निमढेलावर राज्य करणारी ‘झरणी’ ही वाघीणसुद्धा अधूनमधून येऊन जाते. मात्र, ‘के मार्क’ वाघिणीच्या अधिवास क्षेत्रात तिचेच वास्तव्य आहे. यात ती कुणाला लुडबूड करु देत नाही.