वर्धा : निसर्गचक्रात अतिशय महत्वाचे स्थान असलेला पक्षी म्हणून गिधाडाची ओळख दिल्या जाते. मृत अवशेष फस्त करणारा म्हणून त्यास निसर्गाचा सफाई कामगार अशी ओळख मिळाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे याच्या सर्वच प्रजाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर नजरेस गिधाड पडताच तो विरळा दिवस समजल्या जातो. वर्धेत बोर व्याघ्र प्रकल्पालगत सालई गावात एक मोठा पक्षी वरून खाली पडल्याचे युवकांना दिसून आले.

याची माहिती वन्यप्रेमी जतीन रणनवरे यांना मिळताच त्यांनी हिंगणी वन अधिकारी तसेच पीपल फॉर अॅनिमल्स या संघटनेस कळविले. संघटनेच्या करुणाश्रम या आश्रयस्थानी त्यास हलविण्यात आले. तेव्हा तो अतीदुर्मिळ प्रजातीतला लांब चोचीचा गिधाड असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासणीत तो पक्षी मात्र गंभीर अवस्थेत असल्याचे तसेच आपली मान वारंवार त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवत असल्याचे दिसून आले. पशू चिकित्सकांनी त्यास विषबाधा झाल्याचा अंदाज बांधत उपचार सुरू केले.

The central government has not given new permission for onion export but the open export of onion from the country is closed
कांद्याची खुली निर्यात बंदच, केंद्राचे आकडे गेल्या वर्षभरातील
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

हेही वाचा : पावणेदोन लाख विद्यार्थ्यांवर शाळाबाह्य़ होण्याचे संकट!; ‘समूह शाळे’च्या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांची नाराजी

तीन दिवसाच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होत तो अन्न ग्रहण करू लागला. गंभीर विषबाधा झाल्याने त्याच्या पंखात बळ नव्हते. उडण्यास असमर्थ होता. योग्य उपचार व आहार देणे सुरूच होते. अखेर करुणाश्रमच्या चमूस यश आले. तब्बल दोन महिन्याच्या निगराणी नंतर यश आले. तो उडण्यस समर्थ असल्याची खात्री झाल्यावर तज्ञांच्या देखरेखीत पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा निर्णय झाला.कारण या क्षेत्रात अश्या गिधाडांचे अधिवास व घरटी करण्याचे ठिकाण आहे. येथे मुक्त करण्यात आल्यावर अखेर त्याने आकाशात झेप घेतली.

हेही वाचा : भरधाव ट्रक ऑटोवर उलटला, भीषण अपघातात चार ठार

पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप जोगे तसेच चमुतील ऋषिकेश गोडसे, अभिषेक गुजर, मंगेश येनोरकर, शुभम बोबडे, कौस्तुभ गावंडे यांनी आनंद व्यक्त केला. गिधाडास निरोप देताना वन संरक्षक सरीलक्ष्मी, उपवनसंरक्षक राकेश सेपट, करुणाश्रमचे आशिष गोस्वामी, वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला, अक्षय आगाशे, विवेक राजूरकर, उधमसिंग यादव, अविनाश लोंढे, अजिंक्य भटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा : लोकजागर : पावसाचा बंदोबस्त कराच!

गोस्वामी यांनी नमूद केले की देशातील गिधाडे नामशेष श्रेणीत असल्याने त्याचे संवर्धन करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. अधिक गंभीर बाब म्हणून त्यास परिशिष्ट एक मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तर इंटरनॅशनल युनियन फॉर काँझर्वेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा पक्षी नष्टप्राय होत असल्याचे घोषित केले आहे. यापैकी एक असलेला सुखरूप आकाशी झेपावला याचा अतिशय आनंद असल्याचे गोस्वामी म्हणाले.