वर्धा : काळ वेळ सांगून येत नाही म्हणतात. तसेच या अपघातात घडले. वडनेर ते सिरसगाव रस्त्यावर असलेल्या सुरकार यांच्या शेताजवळ एक टिप्पर सकाळपासून उभा होता. नादुरुस्त झाल्याने टिप्पर सोडून चालक निघून गेला होता. त्याच रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी चालकास उभा टिप्पर अंधार असल्याने दिसला नाही. तो टिप्पर वर आदळून खाली पडला. जखमी अवस्थेत तळमळत असतांना सिरसगाव कडून एक कार येत होती. जखमी दुचाकी चालकास पाहून ती थांबली. त्यातून काही मदत करण्यास उतरले.

त्याची विचारपूस करीत उपचारासाठी त्यास कार मध्ये नेत होते. त्याच वेळी वडनेर कडून वेगात येणाऱ्या रेती भरलेल्या टिप्पर चालकाने निष्काळजी पणे आपले वाहन चालविले. त्याची धडक मदत करणाऱ्यांच्या कारला बसली. त्यात तिघे चिरडल्या गेले. तर दोघे गंभीर जखमी झालेत.

हेही वाचा…नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी; दुकान मालकाचा महिलेवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येरणगाव येथील राहणारे विजय देवतळे ४५, अक्षय कोलवडे २७ तसेच आलमडोह येथील राहुल नैताम यांचा मृत्यू झाला असून कात्री येथील रतन पचारे व अर्जुन मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी दोघांना वडनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी उशीरा घडलेली ही घटना आहे.