संत साहित्यात सुरुवातीला असलेली सामाजिकता कालांतराने ईश्वरवादाकडे वळली. त्यामुळे सामाजिक मूल्यांकडे संतांचे दुर्लक्ष झाले, अशी खंत संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. साहित्य विहार आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्य, संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी प्रसिद्ध लेखक प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सदानंद मोरे बोलत होते.

हेही वाचा- न्यूजर्सीच्या ‘ली’, व्‍हर्जिनियाची जेन यांना रामटेकच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
bacchu kadu reaction on mahayuti
प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात? बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

संत साहित्याला जसे आध्यात्मिक पैलू आहेत, तसेच त्याला भाषिक व सामाजिक पैलू देखील आहेत. समाजातील स्त्रियांचा, वंचित घटकांचा उद्धार व्हावा, यासाठी संतांनी समाजाच्या भाषेत संत साहित्य निर्माण केले व वैचारिक परिवर्तन घडवून आणले, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

हेही वाचा- नागपूर विद्यापीठातील निवडणुकीत काँग्रेसमधील घरभेदी कोण?

डॉ. मोरे पुढे म्हणाले, संत ही महाराष्ट्राची देण असून संतत्व म्हणजे काय याचा विचार महाराष्ट्रानेच प्रथम दिला. संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाईने पहिल्यांदा ताटीच्या अभंगांमधून संतांची व्याख्या केली. संताला कसे सामाजिक भान असले पाहिजे, हे मुक्ताबाईने सांगितले. संत साहित्यात सुरुवातीला असलेली सामाजिकता कालांतराने ईश्वरवादाकडे वळली. त्यामुळे सामाजिक मूल्यांकडे संतांचे दुर्लक्ष झाले, अशी खंतही डॉ. मोरे यांनी व्यक्त केली.