नागपूर : उल्कापातामुळे झालेली निर्मिती म्हणजे राज्यातील बुलढाणा जिल्हयातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर. बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. अशा या सरोवरात गेल्या काही दिवसांपासून बिबट सातत्याने दर्शन देत आहे. सुर्याची कोवळी किरणे अंगावर पडून सोनेरी भासणारा बिबट ‘मी लोणारकर’ चमूतील सचिन कापूरे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. सोबतीला याच चमूचे सदस्य संतोष जाधव देखील होते.

लोणार सरोवर परिसरात सुमारे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवराची निर्मिती ५० हजार वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. मात्र, एका शोधनिबंधात ते त्याहीपेक्षा अधिक वर्ष जुने असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या सरोवराची निर्मिती नेमकी किती वर्षांपूर्वी हे कुणीही सांगू शकत नाही. या सराेवराच्या निर्मितीपासून अनेक संशोधन संस्था, संशोधक याठिकाणी संशोधन करायला येतात. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. १८२३ मध्ये जे.ई. अलेक्झांडर हे ब्रिटिश अधिकारी, तलावाला भेट देणारे पहिले युरोपियन होते.  महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा हा तलाव आहे. हा एकेकाळी मौर्य साम्राज्याचा आणि नंतर सातवाहना साम्राज्याचा भाग होता.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा
loksatta analysis measures to prevent river water from pollution in maharashtra
विश्लेषण : राज्यातील नद्या केव्हा स्वच्छ होणार?

हेही वाचा >>>दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण झाले अन् भररस्त्यात तरुणाला संपवले

चालुक्य आणि राष्ट्रकूटांनीही या भागात राज्य केले. मोगल, यादव, निजाम आणि ब्रिटीशांच्या काळात या भागात व्यापार वाढला. सरोवराच्या कक्षेत सापडलेली अनेक मंदिरे यादव मंदिर आणि हेमाडपंती मंदिरे म्हणून ओळखली जातात. जगभरातील संशोधक व संशोधन संस्था याठिकाणी संशोधनासाठी येत असताना एवढा मोठा खजिना भारतीयांना नीटसा जपता आला नाही. सरकारचेही याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, शहरातील काही अधिकारी, कर्मचारी, अभ्यासक यांनी एकत्र येऊन या सरोवराच्या संवर्धनासाठी आपला थोडा हातभार लावला. ‘मी लोणारकर’ या नावाने एक चमू गठीत झाली आणि दर शनिवार, रविवारी हा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. त्यांच्यामुळेच सरकारचे याकडे लक्ष गेले आणि आता कुठे त्याच्या संवर्धनासाठी पावले उचलली जात आहेत.

‘मी लोणारकर’चे सचिन कापुरे, संतोष जाधव जंगल भ्रमंती करत असताना त्यांना लोणार अभयारण्यातील सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हाचा आनंद घेताना हा सुंदर चमकदार बिबट आढळला. त्यांनी लगेच ही सुंदर छटा कॅमेरात कैद केली. लोणार अभयारण्यात आता बिबट वाढत आहे. तुलनेने लोणारचे क्षेत्र मात्र त्यांच्यासाठी कमी पडत आहेत.