Premium

लोकसभेचे पडघम : विरोधकांची जोरदार तयारी; शिवसेना ठाकरे गट मात्र अंतर्गत गटबाजीत अडकला

लोकसभेचे पडघम वाजू लागले असून भाजप, शिंदे गत जोरदार तयारी करीत असताना जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट मात्र अंतर्गत गटबाजीने पोखरत चालला आहे.

Sudhir Cover, Suresh Mapari
सुधीर कव्हर, सुरेश मापारी

वाशीम : लोकसभेचे पडघम वाजू लागले असून भाजप, शिंदे गत जोरदार तयारी करीत असताना जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट मात्र अंतर्गत गटबाजीने पोखरत चालला आहे.  नुकताच ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख तथा बांधकाम सभापती सुरेश मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर बॅनर लावण्यात आले. परंतु या बॅनर मध्ये जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांच्यासह सच्चा शिवसैनिक कुठेच झळकला नसल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील उभी फूट जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदे गट वेगळा निघाला तेव्हा त्यांच्यासोबत जिल्ह्यातील खासदार गवळी यांच्यासोबत रिसोड तालुक्यातील बोटावर मोजण्या इतके शिवसैनिक सोडले तर संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती. दरम्यानच्या काळात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रंजना पोळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला. या प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना अटक होऊन काहीं दिवस कोठडीतही जावे लागले होते. याच अनुषंगाने पक्षप्रमुखांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी कट्टर शिवसैनिक सुधीर कव्हर यांची नियुक्ती केली आणि जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटामध्ये उभी फूट पडली.

हेही वाचा >>> भंडारा : आता ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले नाना पटोलेंचे बॅनर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अगोदरच एका शिवसेनेचे दोन शकल झाले असतानाच जिल्ह्यातील शिवसेना अंतर्गत गटबाजीने पोखरत चालली आहे. सर्वच पक्ष आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच शिवसेना मात्र जिल्ह्यात बॅकफुटवर गेली आहे. अशीच गटबाजी कायम राहिली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरोधकांशी कसा लढेल?, शिवसेनेला जिल्ह्यात भविष्य आहे काय असे अनेक प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना भेडसावत असून सच्चा शिवसैनिक दोन गटाच्या वादात अडकले भागाला असल्याने नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला त्याची किंमत मोजावी लागली होती.

हेही वाचा >>> नागपूर : अकरा महिन्यांत ७१ कोटींची मदत, मुख्यमंत्री वैद्यकीय मदतीचा चढता आलेख

आता लोकसभा, विधानसभा निडणुकांच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी विरोधकांच्या पथ्यावर पडणार अशी माहिती आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा गड आहे. मात्र खासदार भावना गवळी शिंदे गटात दाखल झाल्याने शिवसेना ठाकरे गटात त्या तोडीचा कुठलाच नेता नाही. त्यातच जिल्ह्यात माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी व विद्यमान जिल्हा प्रमुख सुधीर कव्हर असा गट पडला असून सुरेश मापारी यांच्या वाढदिसानिमित्त शहरात मोठं मोठे बॅनर लावण्यात आले होते. परंतु त्यामध्ये विद्यमान जिल्हा प्रमुख सुधीर कव्हर यांच्यासह सच्चे शिवसैनिकांना कुठलेच स्थान दिले नसल्याने शिस्तप्रिय सेनेत जिल्ह्यात मात्र कुठलीच शिस्त राहिली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lok sabha by election opposition prepares the shiv sena thackeray group stuck internal factionalism pbk 85 ysh

First published on: 04-06-2023 at 09:38 IST
Next Story
नागपूर : अकरा महिन्यांत ७१ कोटींची मदत, मुख्यमंत्री वैद्यकीय मदतीचा चढता आलेख