अलिबाग- रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटापाठोपाठ भाजपनेही खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधातील तलवार अखेर म्यान केली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या मध्यस्थीनंतर पक्षातील मतभेदांवर पडदा पडला असल्याचे सांगितले जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबध ताणले गेले होते. कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकरे यांना उमेदवारी नको आणि भाजपचे धैर्यशील पाटील हे महायुतीचे रायगडचे उमेदवार हवेत, अशी आग्रही भूमिका भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने पक्षनिरीक्षकांकडे केली होती. तटकरेंना उमेदवारी दिली तर त्याचे विपरीत परिणाम होतील असा इशारा भाजपचे आमदार रविंद्र पाटील यांनी दिला होता. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंसाठी सोडण्यात आली. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणीत निराशेचे वातावरण होते.

maneka gandhi varun gandh
भाजपाने वरुण गांधींचं लोकसभेचं तिकीट कापलं, आई मनेका गांधी म्हणाल्या, “या निवडणुकीनंतर…”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”

हेही वाचा – अमरावतीत राजकीय वैरत्‍वाचा दुसरा अंक

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मुंबईत आपल्या निवासस्थानी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत पाटील, दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, पेणचे भाजप आमदार रविंद्र पाटील. जिल्हा संघटक सतिश धारप, बाळासाहेब पाटील, महेश मोहीते आदी नेते उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पक्षादेश पाळत सुनील तटकरे यांच्या प्रचारात सहभागी होण्याचे निर्देश सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीनंतर भाजप नेत्यांनी तटकरेंविरोधातील आक्रमक भूमिका मवाळ झाली असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी रायगड आणि बारामतीच्या जागेवरून असेलल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. या बैठकीला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे तिन्ही आमदार बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद आणि मतभेद संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही तटकरे यांच्या विरोधातील तलवार म्यान केली आहे.

हेही वाचा – चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवणे हे भाजपचे मुळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तडजोडी कराव्या लागणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या पाठीशी पदाधिकाऱ्यांना ठामपणे उभे रहावे लागणार आहे. भाजपचे प्रमुख वॉरियर्स यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. तसे निर्देश त्यांना दिले आहेत. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. – रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकामंत्री तथा कोकण संघटक भाजप