Madhya Maharashtra sensitive Chance heavy rains warming climate change ysh 95 | Loksatta

मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे संवेदनशील; वातावरण बदलामुळे तापमानवाढीसह अतिपावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे आणि अहमदनगर तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे वातावरण बदलासाठी अतिशय संवेदनशील आहेत.

मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे संवेदनशील; वातावरण बदलामुळे तापमानवाढीसह अतिपावसाची शक्यता
वातावरण बदलामुळे तापमानवाढीसह अतिपावसाची शक्यता

नागपूर : मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे आणि अहमदनगर तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे वातावरण बदलासाठी अतिशय संवेदनशील आहेत. भविष्यात या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीच्या उच्चांकासोबतच अतिपावसाच्या घटना वाढणार आहेत. जर्मनीतील ‘पोट्सडेम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमॅट चेंज इम्पॅक्ट’ या संशोधन संस्थेने नासाच्या उपग्रहीय साधनांचा वापर करून केलेले ‘भारतातील हवामान प्रभाव चालकांचे मूल्यांकन’ हे संशोधन २०२२ मध्ये प्रकाशित झाले आहे. या आधारे ही माहिती मिळाली. 

मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांत २००० च्या तुलनेत २०२० पर्यंत तापमानात वाढ झाली. याच गतीने वाढ होत राहिली तर २०३० पर्यंत तापमान ०.५ ते १.० अंश सेल्सिअस, २०५० पर्यंत १.५ ते २.० अंश सेल्सिअस आणि २०८० पर्यंत ते २.५ ते ३.० अंश सेल्सअस पर्यंत जाईल. तापमानवाढीला आळा घालण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना केल्या, तरच ही वाढ ०.७ ते १.४ अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित राहील, असे या अभ्यासात म्हटले आहे.

अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्वतीय क्षेत्रात २०५० नंतर तापमान कमी राहील असाही अंदाज यात आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाणदेखील वाढणार आहे. २०३० पर्यंत पावसाच्या वाढीचे प्रमाण कमी राहिले तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास २०५० ते २०८० दरम्यान २० ते ४० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात ही वाढ १० टक्के असेल.

 मध्य महाराष्ट्रातील या पाचही जिल्ह्यांत पावसाळय़ाच्या सुरुवातीला पाऊस कमी तर परतीच्या वेळी जास्त राहील, असाही अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत अधिक तापमानवाढीचा अंदाज  आहे. त्यासोबतच यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतही २०३० पर्यंत चार ते ३४ दिवस, २०५० पर्यंत १३ ते ६३ दिवस आणि २०८० पर्यंत ३२ ते १२५  उष्ण दिवसांत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

  • धुळे जिल्ह्याला अधिक फटका.. धुळे जिल्ह्यात २०८० पर्यंत सर्वाधिक उष्ण दिवसांत वाढ होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये २०३०-२०५० आणि २०८० पर्यंत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पाऊस अधिक पडला तरीही अतिउष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची वाफ होऊन कोरडे दिवस वाढतील. 
  • आठ ते नऊ मॉडेल्सचा आधार.. अभ्यास करण्यासाठी हवामानाच्या सुमारे आठ ते नऊ विविध मॉडेल्सचा आधार घेण्यात आला. आपण जर हरित वायूचे प्रमाण कमी केले तर हवामान बदलाच्या घटना किती कमी होऊ शकतात, याचासुद्धा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आल्याची माहिती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट; सात महिन्यांत केवळ २ हजार बाधित; आरोग्य विभागाला दिलासा 

संबंधित बातम्या

एकाच ठिकाणी रस्ता, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो; देशातील पहिल्या बहुस्तरीय वाहतूक सुविधेचे पंतप्रधान करणार नागपूरमध्ये लोकार्पण
उपमुख्यमंत्र्यांनी सारथ्य केलेल्या गाडीचा मालक विक्की कुकरेजा कोण आहे?
पंतप्रधानांच्या हस्ते फक्त समृद्धीचं नव्हे तर……
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना : ‘प्रोत्साहन’ योजनेच्या जाचक अटी रद्द ; राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा
“शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गदर चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मानेही केलं होतं काम, शुटिंग करताना खाव्या लागलेल्या शिव्या
KGF चे निर्माते शाहरुख खानला घेऊन करणार चित्रपट; रिषभ शेट्टी दिसणार ‘या’ भूमिकेत
पुणे : हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुंडावर कारवाई; झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध
डोक्यावर पगडी, हातात भाला, ढाल अन्…; गायिका आर्या आंबेकरच्या पोस्टने वेधलं लक्ष
बेळगावात महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक, सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या; म्हणाल्या, “राज्यकर्ते एवढे…”