जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. सहाही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले.सहाही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाचा कार्यकाळ संपल्याने शनिवारी पुढील अडीच वर्षासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
वाशीम पंचायत समिती सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाच्या सावित्रीबाई वानखेडे तर उपसभापतीपदी काँग्रेसचे गजानन गोटे, मालेगाव पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या रंजना काळे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या निर्मला जाधव, रिसोड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या केसराबाई हाडे तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाच्या सुवर्णा नरवाडे, कारंजा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख तर उपसभापतीपदी वंचितच्या अलका अंबरकर, मंगरुळपीर पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेखा भगत तर उपसभापतीपदी उषा राठोड यांची निवड झाली. मानोरा पंचायत समितीमध्ये सभापतीपदावर सुजाता जाधव तर उपसभापती मेघा राठोड यांची निवड करण्यात आली.