नागपूर : प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्यामुळे संतापलेल्या २३ वर्षीय युवकाने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सोमेश (२६, रा. हुडकेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध इतरही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमेशचे ४० वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध असून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. तिने सोमेशचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्यामुळे सोमेश संतापला. सोमवारी दुपारी त्याने महिलेच्या घरात घुसून पैशाची मागणी केली. महिलेने नकार देताच शिवीगाळ करीत तो परत गेला. काही वेळाने पुन्हा तो महिलेच्या घरी आला. यावेळी तो दारू प्यायला होता. त्याने पुन्हा शिवीगाळ करीत महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरड केली असता सोमेश पसार झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमेशचा शोध सुरू केला आहे.

युवकाची आत्महत्या

दहीबाजार झेंडा चौकात राहणाऱ्या जय धनराज अंतुलवार (२६) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. तो भांडय़ाच्या दुकानात काम करीत होता. त्याला अडीच वर्षांची एक मुलगी आहे. पत्नी कांचन (२६) ही दोन दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. पती फोन उचलत नसल्यामुळे पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

विवाहितेची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुही तालुक्यातील देवळी कला येथील रहिवाशी सपना शेषराव उरकुडे (२५) हिने गावातील एका शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. कांचनच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून वेलतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.