शहरात विविध विभागात विकास कामे सुरू असून अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. आर्थिक स्थिती गंभीर नसताना ती दाखवली जात आहे. त्यासंदर्भात मुंबईच्या चार आमदारांनी कुठलीही शहानिशा न करता नागपूरची स्थिती विदारक असल्याचे सांगत विधानसभेत लक्षवेधी मांडली. हा शहराला बदनाम करण्याचा डाव आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण कराचे, मात्र शहराची बदनामी करू नये.  शहराचा विकास थांबवण्याचे प्रयत्न होत असतील तर या अन्यायाविरोधात जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर म्हणाले, महापालिकेत आर्थिक अडचणी असतानाही  विकास कामे वा नगरसेवकांची कामे कधीच प्रशासनाकडून थांबवण्यात आली नाही. अभिजित बांगर आयुक्त असताना त्यांनी अनेक प्रस्ताव मंजूर करून ते राज्य सरकारकडे पाठवले. मात्र गेल्या ३७ दिवसात असे काय घडले की शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या  आणि महापालिकेची आर्थिक स्थिती अचानक गंभीर झाली. महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि विशेष सभेत आयुक्तांनी ज्या विषयावर सभागृहात उत्तर दिले होते त्याच विषयांवर लक्षवेधी कशी काय मांडण्यात आली? आमदार सुनील प्रभू, प्रकाश फातर्पेकर, रमेश कोरगावकर व अजय चौधरी या मुंबईच्या चार आमदारांनी ही लक्षवेधी उपस्थित केली. याद्वारे महापालिका बरखास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यामागे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोपही महापौरांनी के ला. राज्य सरकारकडून महापालिकेला ९८० कोटी रुपये येणे आहे. महापालिके ने ज्या बँके कडून कर्ज घेतले  त्याचे हफ्ते नियमित दिले जात आहे. कर्मचाऱ्याचे नियमित वेतन केले जात आहे. तरीही महापालिके ची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचा अप्रचार करून शहराची बदनामी केली जात आहे. महापालिके ची आर्थिक स्थिती खरच गंभीर असेल आणि ज्या  विभागात घोळ आहे असे जर वाटत असेल तर खुशाल चौकशी करावी. आम्ही कु ठल्याही चौकशीला तयार आहोत. झालेल्या व चालू असलेल्या योजनांच्या कामांची ५०० ते ८०० कोटींची देयके  थकित असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत आयुक्तांनी कु ठल्याही प्रकारची स्वयंस्पष्टता के ली नाही. शहरात कुठलीही कामे खोळंबलेली नाहीत, असा दावाही महापौरांनी यावेळी केला.