scorecardresearch

Premium

एमपीएससी : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे; परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी दरवर्षी आपल्या अनेक नियमांमध्ये बदल करत असते.

Medical examination before interview after passing MPSC exam
२०२३ च्या जाहिरातीच्या मुख्य परिक्षेपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी दरवर्षी आपल्या अनेक नियमांमध्ये बदल करत असते.

financial subsidy for inter caste marriage couple
आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा
education department red and green dots student ID cards criticism maharashtra pune
‘ओळखपत्रावरील ठिपका’ वादात, शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर टीका
exam education
‘या’ नव्या अभ्यासक्रमासाठी आता मिळणार श्रेयांक, उच्च शिक्षण विभागाचे आदेश
Canada New Visa Policy
विश्लेषण : कॅनडाकडून दोन वर्षांसाठी विद्यार्थी व्हिसात कपात करण्याचा निर्णय; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार?

दोन वर्षांपूर्वी झालेला अभ्यासक्रम बदल आपल्याला माहिती असेल. यानुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण ९ पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी २७५ गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५ असतील.

आणखी वाचा-एका लग्नाची गोष्ट : नवरदेव जर्मनीचा अन् नवरी गोंदियाची; विदेशी पाहुणे वरातीत थिरकले अन्…

सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील. असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र याला विरोध झाल्याने आयोगाने हा निर्णय मागे घेतला. परंतु आता पुन्हा नवा बदल करण्यात आला आहे. यानुसार आता एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधीच वैद्यकीय तपासणीला एमपीएससी उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. २०२३ च्या जाहिरातीच्या मुख्य परिक्षेपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तर यानिर्णयानुसार, जानेवारी २०२४ मध्ये या वैद्यकीय तपासणीला सुरूवात होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता.

दरम्यान, हा निर्णय एमपीएससी मुख्य परीक्षा २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Medical examination before interview after passing mpsc exam dag 87 mrj

First published on: 30-11-2023 at 15:35 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×