बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे. रामनवमी निमित्त येथे भव्य यात्रा भरते. दर्शनासाठी वेग वेगळ्या राज्यातून भाविकांचा जनसागर उसळला असून बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांची सभा चांगलीच गाजली. येथूनच त्यांनी बंजारा समाजाच्या प्रश्नावर आवाज उठविणार असून राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे रणशिंग फुंकले आहे.

आयोजित सभेला संबोधित करताना रविकांत राठोड म्हणाले की, राज्यात बंजारा समाज मोठा आहे. मात्र केवळ राजकीय हेतू समोर ठेवून केवळ मत पेटीसाठी बंजारा समाजाचा वापर होतो. बंजारा समाजाच्या समस्या आजही तश्याच आहेत. आजही बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत बंजारा ब्रिगेड उतरणार आहे. जो राजकीय पक्ष, नेते बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देईल, त्या पक्षासोबत आम्ही जाऊ अन्यथा त्यांना बंजारा तांड्यावर बंदी घालू, असं वक्तव्य त्यांनी केले.

हेही वाचा >>>यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात रविकांत राठोड यांचे मोठे कार्य आहे. बंजारा समाजातील उभरते नेते म्हणून ते युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. ऊसतोड कामगार ही बंजारा समाजाची ओळख पुसून टाकण्यासाठी बंजारा ब्रिगेड प्रयत्नशील राहील, असेही राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड म्हणाले. त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.