जिल्ह्यातील तलावांवर पाहुणे पक्षी दाखल झाले आहेत. आखातवाडा येथील तलावावर कृष्ण करकोचासह विविध पक्ष्यांचे दर्शन होत आहे. पक्षी मित्रांनी निरीक्षणाचा आनंद घेतला. जिल्ह्यातील आखातवाडा येथील तलावावर विविध पाहुणे पक्षी दाखल होत असतात. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दीड महिना अगोदरच पक्ष्यांचे आगमन झाले. आखातवाडा तलावावर पक्षी मित्रांना निरीक्षणाचा आनंद अनुभवता आला.

हेही वाचा >>> बुलढाणा : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं ठरलं! प्रशासनाला कोणतीही माहिती देणार नाही, प्रशिक्षणासह सर्वेक्षणावरसुद्धा बहिष्कार

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Wild dogs were found for the first time in Phansad Sanctuary
फणसाड अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानकुत्र्यांचा वावर

ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, नवल अग्रवाल, लाला शर्मा, डॉ.अशोक राठी आदींना आखातवाडा तलावावर मुग्ध बलाक, उघड चोचीचे करकोचे, कांडेसर, चमचा, शेकाटे यांच्यासह कृष्ण (कांड्या) करकोचा पक्ष्यांचे दर्शन झाले. पाहुण्या पक्षांची संख्या अल्प असली तरी लवकरच ते मोठ्या संख्येने आखातवाडा तसेच पंचक्रोशीत आपला मुक्काम ठोकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पक्षी निरीक्षणाचा आनंद अनुभवता आली. हिवाळी स्थलांतर करत पक्षी लवकरच मोठ्या संख्येने अकोल्याच्या पाणवठ्यांवर दाखल होतील, असा आशावाद ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी व्यक्त केला.