अमरावती : लोकसभा निवडणुकीतील प्रहार जनशक्‍ती पक्षाची भूमिका विविध ठिकाणच्‍या कार्यकर्त्‍यांशी चर्चा केल्‍यानंतर येत्‍या ११ एप्रिल रोजी जाहीर करण्‍यात येईल, आम्‍ही कुणाला उमेदवारीसाठी विनंती करणार नाही, आम्‍हाला सहभागी करून घ्‍या, असेही म्‍हणणार नाही, असे सांगून महायुतीतील घटक पक्ष असलेल्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी वेगळी चूल मांडण्‍याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा >>> गडचिरोली-चिमूर लोकसभेची यादी अडली कुठे? महायुती, महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ

Rajan vichare, nomination,
राजन विचारे करणार २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी
Participation of school children in Nitin Gadkaris campaign Election Commission orders of action
गडकरींच्या प्रचारात शाळकरी मुलांचा सहभाग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
Jan Vikas Foundation supports Dr Prashant Padole of Congress
भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट
Akhilesh Yadav
रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

बच्‍चू कडू यांनी गुरुवारी रात्री अमरावती प्रहारच्‍या कार्यकर्त्यांच्या  मेळाव्‍याचे आयोजन केले होते. या मेळाव्‍यात निवडणुकीतील भूमिकेविषयी चर्चा झाली.बच्‍चू कडू पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले, शेतकरी, शेतमजूर, कृषी क्षेत्रातील विविध प्रश्‍नांचा विचार करून एक आम्ही मसुदा तयार करणार आहोत. आम्हाला कुठे खेळी खेळायची आहे यावर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. आम्‍ही कोणाला उमेदवारी करिता विनंती करणार नाही आम्हाला सहभागी करून घ्या, असेही म्‍हणणार नाही. हा भिकारीपणा आम्‍ही करणार नाही त्याची गरज पण नाही. प्रहार  हा एका तालुका किंवा जिल्ह्या पुरता मर्यादित विषय नाही. राज्यात खालून वर पर्यंत आमचे कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीविषयी ११ एप्रिल रोजी अंतिम निर्णय घेणार. भूमिका जाहीर करणार, असे बच्‍चू कडू म्‍हणाले.

हेही वाचा >>> “मी लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम,” अमर काळेंचा निर्धार

अमरावती मतदार संघातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहेत.परिस्थिती पाहून आम्ही योग्य निर्णय घेऊ, असे सांगून बच्‍चू कडू यांनी अप्रत्‍यक्षरीत्‍या राणा दाम्‍पत्‍याशी तूर्तास जुळवून घेतलेले नाही, असे संकेत दिले. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेव्हा रट्टा मारायचा तेव्हा आम्ही मारू.आम्ही चुकीची वाट पाहत आहोत. काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनवू शकते, असे बच्‍चू कडू म्‍हणाले.