नागपूर : मुंबईतील एका वृद्ध महिलेचा खून करून ३० तोळे दागिने पळवणाऱ्या आरोपीला नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. अकबर अमीर बादशाह शेख (२२) रा. माटुंगा असे आरोपीचे नाव आहे.

१९ मार्चला संध्याकाळी वसंता लक्ष्मीनारायणन (७९) रा. पर्ल बििल्डग, वसई यांचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून करण्यात आला होता. तसेच त्यांच्या अंगावरील व घरातील ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी शाहुनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

तपासादरम्यान मुंबई पोलिसांना आरोपी मुंबईतून नागपूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नागपूर पोलिसांना माहिती दिली. सीए मार्गावरील ग्रॅन्ट हॉटेलमध्ये एक संशयास्पद व्यक्ती लपून असल्याची माहिती पोलिसांना समजली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून त्याला व इतर तीन साथीदारांना अटक केली.