भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेल्या आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयावर अखेर नगर परिषदेने अतिक्रमण मुक्त मोहिमेंतर्गत बुलडोझर चालवला. शहराच्या विविध भागांत अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली होती. हीच बाब लक्षात घेत नगर परिषदेने कालपासून अतिक्रमण मुक्त मोहीम हाती घेतली आहे. शहरातील मुस्लीम लायब्ररी चौकात नगर पालिकेच्या गांधी विद्यालयाच्या समोरील गाळ्यात आ. भोंडेकर यांचे कार्यालय आहे.

या कार्यालयाच्या समोरील भागात त्यांनी टिनाचे शेड उभारले असून ते अतिक्रमणात होते. राज्यात सत्तांतर झाल्यावर आ. भोंडेकर शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर १२ नोव्हेंबरला भंडाऱ्यात आले होते. त्यांच्या हस्ते आ. भोंडेकर यांच्या या कार्यालयाचे उद्घाटन झाले.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन

हेही वाचा: अधिवेशनात घोषणा आणि निदर्शनाचा स्तर खालावतोय !

लोकप्रतिनिधी असतानाही भोंडेकर यांनी स्वत:च्या कार्यालयासाठी अतिक्रमण करणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. अखेर, नियम सर्वांना सारखेच आहेत, असे सांगत नगर परिषदेने हे अतिक्रमण काढले. नगर परिषदेकडून संपूर्ण शहरात अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्यात आली. यात आ. भोंडेकर यांच्या कार्यालयावरील कारवाई विशेष ठरली. संपूर्ण शहरात या कारवाईबाबत खमंग चर्चा रंगली आहे.