नागपूर : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि सहजपणे प्रवाश्यांना तिकीट उपलब्ध व्हावा याकरीता मेट्रो प्रशासनाच्या वतीने तिकीट खरेदी करण्याकरता अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या प्रयत्नांना मेट्रो प्रवाशाची देखील पसंती मिळत आहे. दररोज ५० टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट घेऊन मेट्रोने प्रवास करीत आहेत.
दररोज व नियमित पणे मेट्रो प्रवाश्याची संख्या वाढत असून या वाढत्या रायडरशिप मध्ये कॅशलेस व्यवहारला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ५० टक्के तिकटी विक्री ऑनलाइन माध्यमाने होत आहे; प्रत्येक दोन पैकी एक प्रवासी ऑनलाइन माध्यमाने तिकीट घेत आहे महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. याकरिता महा कार्ड,तिकीट व्हेंडिंग मशीन, व्हॉट्सऍप तिकीट,ऑनलाईन पेमेंट मोबाइल ऍप पर्याय प्रवा्शांना उपलब्ध करून दिले. आतापर्यंत १ लाख ९ हजार,२६१ कार्ड विकल्या गेले आहेत. महा कार्ड मेट्रो भाड्यांवर १० टक्के सवलत प्रदान करते.
ऑनलाईन तिकीटमधील हिस्सा
१) महाकार्ड -२८ टक्के २) तिकीट व्हेंडिंग मशीन -७ .५०% ,३) व्हॉट्सऍप : ७.५०% , ३) ऑनलाईन पेमेंट – ६.५०% ,४) मोबाइल ऍप – १%
या सर्व ऑनलाइन प्रणाली मध्ये प्रवासी महा कार्डचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करत असतात. या प्रणालीच्या माध्यामाने प्रवाश्यांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्सवर फक्त त्यांचे महा कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केले जाते.
महा मेट्रोने आजपर्यंत प्रवाश्यांच्या दृष्टीने अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात विशेषत्वाने विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकएंड सवलत, दैनिक पास फक्त १००रुपयात आणि महाकार्डने प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.