शहरात सक्तीनंतर सुरू असलेला हेल्मेटचा काळाबाजार आणि रस्त्यांवर विकण्यात येत असलेल्या आयएसआय मार्कच्या हेल्मेटच्या धक्कादायक प्रकाराची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात तक्रार करणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत-विदर्भ प्रदेशच्या पत्रावर जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी गृह विभागाचे सचिव, पोलीस आयुक्त, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर वाहनचालकांची हेल्मेटच्या दुकानावर गर्दी वाढली आहे. यामुळे हेल्मेटच्या काळाबाजार वाढला असून बनावट आयएसआय मार्कसोबत बाजारभावापेक्षा अधिक पैसे घेऊन धडाक्यात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने हेल्मेटचे मनमानी दर आणि काळ्या बाजारावर अंकुश लावण्याचे संकेत दिले होते. परंतु आतापर्यंत त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नसल्यामुळे आयएसआय मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे. हेल्मेटची गुणवत्ता आणि किंमत यासाठी जबाबदार विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur high court notice to home secretary police commissioners on helmet issue
First published on: 30-04-2016 at 04:43 IST