नागपूर : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूरच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना सीबीआयने लाच घेताना अटक केल्याच्या प्रकरणात रक्कमेची जुळवाजुळव करणारा नागपुरातील एक वकील सीबीआयच्या रडारवर आहे. सीबीआय त्याला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सीबीआयने इंडियन ऑईल नागपूर शाखेचे महाव्यवस्थापक रोडगे, विक्री अधिकारी सुनील गोलार आणि मनीष नंदिले यांना लाच घेताना पकडले होते. यापैकी नंदेले आणि गोलार हे सीबीआय कोठडीत आहेत तर एन.पी. रोडगे हा फरार आहे. रोडगेचे तीन वेगवेगळय़ा बँकेत लॉकर आढळले असून त्यामध्ये मोठे घबाड सीबीआयच्या हाती लागू शकते.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

पंपचालकांकडून लाचेची रक्कम घेऊन या तीनही अधिकाऱ्यांसह अन्य काही अधिकाऱ्यांना पैसे पोहचवण्याचे काम नागपुरातील एक वकील करीत होता, अशी माहिती आहे.

वरील अधिकाऱ्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढल्यास वकिलाचा या प्रकरणातील सहभाग उघड होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वकील इंडियन ऑईल कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून देवाणघेवाणीची चर्चा करीत असे. तसेच लाचेची रक्कम ही वकिलाचे शुल्क आहे, असे दर्शवून कंपनीच्या अधिकाऱ्यांना पैसे पोहचवण्याची व्यवस्था करीत असे.

सर्च रिपोर्टच्या नावावर घोळ

नवीन पेट्रोल पंप पाहिजे असणाऱ्यांना नागपुरातील वकील भेटत होता. तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत असलेले छायाचित्र आणि मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप चटिंग दाखवून पेट्रोल पंप मंजूर करून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम उकळून अधिकाऱ्यांना देत होता. ‘सर्च रिपोर्ट’च्या नावावर हा प्रकार करण्यात या वकिलाचा हातखंडा होता. या सर्व घडामोडींवरून वकिलाचे कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत असलेले लागेबांधे स्पष्ट होते.

इंडियन ऑईल कंपनीच्या लाचखोर अधिकाऱ्यांसोबत एका वकिलाचे तार जुळले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या वकिलाची चौकशी करून या प्रकरणात त्याचा सहभाग आढळल्यास कारवाई केली जाईल. – एम.एस. खान, पोलीस अधीक्षक, सीबीआय, नागपूर