लोकसत्ता टीम

नागपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने २० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला. सदर घटना सावनेर तालुक्यातील आहे.बळीराम तुळशीराम इरपाची (५५) असे आरोपीचे नाव आहे. तो सावनेर येथील रहिवासी असून व्यवसायाने मजूर आहे.

nagpur wife murder for 200 rupees marathi news
दोनशे रुपयांसाठी पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या, आता मागितली शिक्षेत सुट; न्यायालयाने…
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता

घटनेच्या वेळी पीडित मुलगी ( १४ वर्षे) घरी एकटीच होती. तिचे तिचे आई-वडील सकाळी कामावर निघून जात होते. आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. त्याने एप्रिल ते ऑगस्ट-२०१९ या काळात मुलीला पैसे देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. परिणामी, तिची प्रकृती खराब झाली. तिला उपचारासाठी नागपुरातील मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती पालकांना दिली.

आणखी वाचा-मुंबईतील डब्बेवाल्यांच्या पाल्यांना नागपुरातून मदतीचा हात…

दरम्यान, मुलीने नातेवाईकांना घटनेबाबत माहिती दिली. आरोपीविरुद्ध १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सावनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली व सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकारच्यावतीने अॅड रश्मी खापर्डे यांनी बाजू मांडली. विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.