नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात नागपुरात शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. बंडखोर एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

शनिवारी दुपारी बारा वाजता आमदार दुष्यंत चतुर्वेदी व महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक रेशीमबागेतील शिवसेना कार्यालयात एकत्र आले. कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर त्यांनी बंडोखोर एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला. संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणा दिल्या. शिंदेंच्या प्रतिमेला चपला मारण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंडखोरांना जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी दिली. ते म्हणाले, ‘आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्या आदेशाची वाट बघत आहोत. आम्ही सेनेचे मावळे असून शेवटपर्यंत शिवसेनेसोबतच राहू.’ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.