scorecardresearch

Premium

“राज्य सरकार राज्याला ड्रग्सच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे”, नाना पटोले यांचा आरोप

गुजरातचे ड्रग महाराष्ट्रात आणण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे. राज्य सरकार राज्याला ड्रग्सच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Nana Patole criticized government
"राज्य सरकार राज्याला ड्रग्सच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे", नाना पटोले यांचा आरोप (image credit – Nana Patole Twitter/loksatta graphics)

नागपूर : गुजरातचे ड्रग महाराष्ट्रात आणण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे. राज्य सरकार राज्याला ड्रग्सच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे. ललित पाटीलच्या माध्यमातून यापूर्वी पुढे आले आहे. मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात ड्रग्स येत असून यात राज्य सरकारचे त्यावर नियंत्रण नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते. महाराष्ट्रात ड्रग गुजरातमधून येत असताना सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रगचे समूळ नष्ट करू असे जाहीर केले असले तरी गुजरातवरून ड्रगचा पुरवठा कसा होतो याची चौकशी केली पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

farmer protest Tear gas shells fired at Shambhu border
VIDEO : शंभू सीमेवर तणाव! पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा; तर कृषीमंत्र्यांकडून आंदोलकांना नवी ऑफर
ec orders immediately suspend three senior officials in evm theft case
पुणे: मतदान यंत्रे चोरी प्रकरण तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोवले
Eknath Shinde Abhishek Ghosalkar
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय
Controversy of the agitation in 2018 to demand permanentization of contract workers Mumbai news
कंत्राटी कामगरांना कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी २०१८ मध्ये केलेल्या आंदोलनाचा वाद; महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला औद्योगिक न्यायालयाचा तडाखा

हेही वाचा – बुलढाणा : देऊळगाव राजा येथील वैद्यकीय अधीक्षकांना जातीवाचक शिवीगाळ; धमक्याही दिल्या, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मराठवाड्यात कुणबी मोठ्या प्रमाणात आहेत मात्र त्यांना फायदे मिळत नाहीत. शिंदे समितीला नोंदी आढळल्या असून त्यात मराठा हा शब्द आढळतो, जनगणना महत्त्वाची गोष्ट आहे, केंद्र सरकारने जनगणना थांबवून ठेवली आहे, ५० टक्क्यांची मर्यादा काढल्याशिवाय आरक्षण देण्यात अडचण येईल, असेही पटोले म्हणाले.

अजित पवार यांच्या आईला मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. त्यात काहीच चूक नाही. मात्र महायुतीमध्ये अजित पवार यांना संधी मिळेल, असे वाटत नाही, असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा – “दुष्काळ जाहीर करताना चेहरे बघून सरकारने घोषणा केली”, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

छत्तीसगढमध्ये भाजपाने जाहीरनामा काढला. गॅस सिलिंडर ५०० रुपयांत देण्याचे सांगितले, पंतप्रधान हे देशाचे आहेत मग देशभरातील जनतेला द्यायला पाहिजे. धानाला आधारभूत किंमत वाढवण्याचे सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री नसून देशाचे पंतप्रधान सांगत आहेत, असेही पटोले म्हणाले. महागाई कितीही केली तरी लपवता येत नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष राज्यात फिरत आहेत तेव्हा याचा अनुभव त्यांनाही आला आहे. पंतप्रधान सांगतात की, देशात गरिबी नाही, मग ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा का केली, त्यातही रेशनमध्ये सर्वच धान्य मिळत नाही, हा जुमला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patole criticized the state government on the issue of drugs vmb 67 ssb

First published on: 05-11-2023 at 13:22 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×