गडचिरोली : वयाच्या १५ व्या वर्षी नक्षल चळवळीत दाखल होऊन क्रांतीची स्वप्ने पाहणारी तरुणी. त्यांनतर मुख्य प्रवाहात सामील होत वकील, आमदार आणि आता तेलंगणा सरकारमध्ये मंत्री असा प्रवास करणाऱ्या डॉ. दानसारी अनसुया उर्फ सीताक्का हे नाव सध्या चर्चेत आहे. तेलंगणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बीआरएस पक्षाचा पराभव करीत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी बहुल मुलुग मतदारसंघातून निवडून आलेल्या सीताक्का यांनादेखील स्थान मिळाले आहे.

करोना काळात नागरिकांसाठी केलेले मदतकार्य त्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत सीताक्काने अनेकांचे लक्ष वेधले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदाच तेलंगणात सत्ता स्थापन केली. काँग्रेसकडून मुलुग मतदारसंघातून सीताक्कादेखील निवडून आल्या. १९८५ नंतरच्या काळात काकतीया विद्यापीठातील अनेक पदवीधर तरुणांनी पीपल्स वार ग्रुपसह जनशक्ती या नक्षलवादी संघटनेत प्रवेश केला होता. त्यात सीताक्कादेखील होत्या. १९७१ साली तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मुलुग येथे जन्मलेल्या सीताक्कानी १९८५ ते १९९४ दरम्यान नक्षल चळवळीत मोठी भूमिका बजावली. गावाला लागून असलेली छत्तीसगडची सीमा, घनदाट जंगल परिसर यामुळे वारंगल आणि करीमनगर हे दोन जिल्हे त्यावेळी नक्षलवादी चळवळीचे केंद्र समजल्या जायचे. त्याभागात सीताक्काचा चांगलाच दरारा होता. परंतु काही काळ या चळवळीत घालवल्यानंतर बंदुकीच्या नळीतून क्रांती होऊ शकत नाही, हे लक्षात येताच १९९४ साली आत्मसमर्पण करीत सीताक्का लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्या. दरम्यानच्या काळात कायद्याचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही काळ वारंगल कोर्टात वकिलीदेखील केली.

Suspect arrested from Yerawada area in view of Prime Minister visit pune print news
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
dispute between mahayuti is not solved in Nandurbar Shinde group still away from campaigning
नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…

हेही वाचा – बंदी असतानाही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री, अकोल्यात महिलेचा पाय…

२००४ मध्ये चंद्रबाबु नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने त्यांना पहिल्यांदा मुलुग मतदारसंघातून विधासभेची उमेदवारी दिली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २००८ साली त्या पहिल्यांदा निवडून आल्या. त्यांनतर २०१४ मध्ये त्यांना पुन्हा पराभवाचे तोंड पहावे लागले. मात्र, त्यांनी आपले कार्य जोमाने सुरू ठेवले व २०१८ मध्ये ‘केसीआर’ लाटेतही निवडून आल्या. नुकत्याच पार पाडल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली. आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सीताक्काला मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. साधी राहणीमान आणि सर्व सामान्यांसाठी असलेली तळमळ यामुळे काँग्रेसच्या विजयासोबत सीताक्काचे नावदेखील प्रकाशझोतात आले आहे.

हेही वाचा – भंडारा : आमदार भोंडेकर-परिणय फुकेंमध्ये धुसफूस! आजी आमदाराने माजी आमदाराचे नाव घेणे टाळले

२०२२ मध्ये पूर्ण केली पीएचडी

सीताक्का यांनी गेल्या वर्षी २०२२ मध्ये उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएचडी पूर्ण केली. लहानपणी मी नक्षलवादी होईल असे कधीच वाटले नव्हते. जेव्हा नक्षलवादी होते तेव्हा मी वकील होईल असे कधीच वाटले नव्हते, वकील झाल्यावर मी आमदार, मंत्री आणि पीएचडी पूर्ण करेल असेही वाटले नव्हते. मात्र, संघर्षातून माणूस घडतो असे त्यांनी समाज माध्यमावर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.