बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुकीत ‘अबकी बार चारसो पार’ च्या वल्गना करणाऱ्या महायुतीचे चौखूर उधळलेले खेचर दिल्लीसमोर कधीच न झुकणाऱ्या महाराष्ट्राने रोखले. आताही सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने प्रज्वलित झालेल्या मशालीच्या ज्वालानी गद्दारांचा कारभार भस्मसात होईल. आघाडी सत्तेत आली तर जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरत शहरासह महाराष्ट्रात सर्वत्र छत्रपती शिवरायांची मंदिरे उभारणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी बुलढाण्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, बुलढाणा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या (आघाडीच्या) उमेदवार जयश्री सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Chandrapur assembly Constituency congress candidate Praveen Padvekar
काँग्रेसने तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले…आता दलित उमेदवार एकटाच……
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा – काँग्रेसने तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले…आता दलित उमेदवार एकटाच……

बुलढाणा लोकसभेत कमी मतांनी आघाडीचा पराभव झाला. हा पराभव मनाला चटका लावणारा ठरला. यामुळे एक गद्दार वाचला असे खासदार प्रतापराव जाधव यांचा नामोल्लेख न करता ठाकरे म्हणाले. लोकसभेतील महायशाने आघाडीचे मनोबल वाढले असल्याचे सांगून यामुळे विधानसभेत आघाडी जास्त एकजूट आणि एकदिलाने एकत्र आली आहे. व्यासपीठावरील मित्रपक्षांच्या उपस्थितीने हे सिद्ध झाले. राज्यात आघाडीची हवा नव्हे वादळ असून आघाडीचे सरकार सत्तेत येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. चाळीस दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा घातला, भगवा, धनुष्य आणि पक्ष चोरला असा घणाघात त्यांनी यावेळी केला. युतीचे शिवरायावरचे प्रेम बेगडी आहे. त्यांना केवळ मते मागण्यासाठी शिवराय पाहिजेत. शिवरायांचा जयजयकार ऐकला की देवेंद्र फडणवीस यांचा जळफळाट होतो. मालवणमध्ये कोसळलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासारखे यांचे शिवप्रेम पोकळ आहे. भ्रष्टाचार करुन बांधण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरण अशुभ हाताने झाल. शिवरायांचा पराक्रमी महाराष्ट्र यांनी दोन नेत्यांच्या आणि गुजरातच्या चरणी अर्पण केल्याची जहाल टीका ठाकरेंनी यावेळी केली.

हेही वाचा – काँग्रेसने तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले…आता दलित उमेदवार एकटाच……

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार रेखा खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रे, लखन गाडेकर, साहेबराव सरदार, सुमित सरदार, काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, धृपदराव सावळे, गणेश पाटील,आमदार धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, रवी पाटील, ॲड. विजय सावळे, रशीदखान जमादार, सुनील सपकाळ, सतीश मेहेंद्रे, रवी पाटील, दत्ता काकस, शिवसेनेचे लखन गाडेकर, अशोक गव्हाणे, दत्तात्रय लहाने उपस्थित होते.

Story img Loader