scorecardresearch

Premium

नक्षल्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याचा संशय

चमरा मडावी (३८, रा. मुरकुटी) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Naxalites killed tribal citizen Korchi taluka North Gadchiroli
नक्षल्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याचा संशय (संग्रहित छायाचित्र)

गडचिरोली: ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भामरागड तालुक्यात बॅनर व पत्रके टाकल्यानंतर मध्यरात्री नक्षल्यांनी उत्तर गडचिरोलीतील कोरची तालुक्यात एका आदिवासी नागरिकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. चमरा मडावी (३८, रा. मुरकुटी) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पोलीस खबरी असल्याचा संशय नक्षल्यांनी मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.

मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहे. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून दक्षिण गडचिरोलीत लागोपाठ तीन हत्या केल्यानंतर नक्षल्यांनी आपला मोर्चा उत्तर गडचिरोलीकडे वळविण्याचे चित्र आहे. पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी २ डिसेंबरला मध्यरात्री कोरची तालुक्यातील मुरकुटी गावातील रहिवासी असलेल्या चमरा मडावीची नक्षल्यांनी गळा आवळून हत्या केली. घटनास्थळावर आढळून आलेल्या पत्रकात चमरा हा पोलीस खबरी असून नक्षल्यांच्या नावावर त्याने अनेकांकडून पैसे गोळा केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, चमरा मडावी हा नक्षल्यांचा समर्थक होता.

illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी
Sanjay Raut
“शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा”, ठाकरे गटातील नेत्याला धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sharad Pawar ANil Deshmukh FB
“…तेव्हा फुटलेल्या आमदारांची घरवापसी होईल”, अनिल देशमुखांनी सांगितल्या शरद पवार गटातील पडद्यामागच्या हालचाली
Baba Kalyani
Money Mantra : बाजारातील माणसं : जुन्या व नव्याची यशस्वी सांगड.. बाबा कल्याणी

हेही वाचा… मनोज जरांगेंच्या सभेसाठी रब्बी हंगामाची पेरणी नाही! चरणगावात विदर्भातील सर्वात मोठ्या सभेचा दावा

२०२१ साली त्याला नक्षल्यांना बंदुकीच्या गोळ्या पुरवठा करण्याचा तयारीत असताना छत्तीसगडमधील बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याची बहीण जहाल नक्षलवादी डिव्हीसी मानसिंग होळी याची पत्नी असून ती सुद्धा नक्षल्यांच्या ‘एमएमसी’ झोनमध्ये विस्तार प्लाटून ३ मध्ये कार्यरत आहे. दारूगोळा पुरवठा करण्यासाठी त्याने नक्षल्यांकडून मोठी रक्कम घेतल्याने त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक तपासानंतर नेमके कारण समजेल असे त्यांनी स्पष्ट केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naxalites killed a tribal citizen in korchi taluka of north gadchiroli ssp 89 dvr

First published on: 03-12-2023 at 11:12 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×