वर्धा: जीवनाचा आनंद घेत मनासारखे जीवन जगण्याचा संदेश देणारे हे गीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुलांशी संवाद साधताना म्हणतात. निमित्त होते अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाच्या भेटीचे. ममता बाल सदन या माईंनी स्थापन केलेल्या अनाथ मुलींच्या आश्रमात गडकरी पोहचले. माईच्या लेकींशी त्यांचा आपुलकीचा संवाद झाला. यावेळी त्यांनी स्वतःचे मन मोकळे करताना सदर गीताचा मुखडा म्हटला. “मै तो चला, जिधर चले रस्ता, मुझे क्या खबर है कहा मेरी मंजिल”, असे जीवनाचे तत्वच जणू गडकरींनी मांडले.

ते म्हणतात, मी वाचून बोलत नाही. जे मनात येईल ते बोलतो. तीनही भाषेत बोलतो. त्यामुळे लोकं माझं खूप ऐकत असतात.नेहमी नव्याचा शोध घेतो. नव्या तंत्राचा शोध घेवून ते उपयोगात आणतो.कोणताही विषय असो, तो एकदा हाती घेतला की न थांबता पूर्ण करतो. प्रत्येक क्षेत्रात नाविन्याचा ध्यास असतो. तुम्ही मुलींनी सुध्दा माईंची स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास ठेवावा.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

हेही वाचा… २० वर्षांपूर्वी बंद झालेली कोळसा खाण पुन्हा सुरू होणार, वेकोलीचा करार काय?

मोठे होवून समाजाला मदत करा, असा हितोपदेश गडकरी यांनी मुलींना दिला. माईंची आठवण सांगताना ते म्हणाले की सोलापुरात प्रथम माझी त्यांची भेट झाली. त्यानंतर सातत्याने भेटी होत गेल्या. या ठिकाणी भेट झाल्यावर आठवणी जाग्या झाल्या. हे ईश्वरीय कार्य आहे. ते थांबता कामा नये. खरे तर असा समाज घडला पाहिजे की अनाथाश्रमची गरजच पडू नये.एखादा प्रकल्प तयार करून तो केंद्राकडे सादर करा. मी सर्व ती मदत करील, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. माईंचे मानसपुत्र व संस्थेचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड यांनी संस्थेला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यास गडकरी यांनी तात्काळ होकार भरला. या प्रसंगी आश्रमातील मुलीने गडकरी यांचे काढलेले चित्र त्यांना भेट देण्यात आले.