ओबीसी समाजातील युवकांना क्रिमीलेअरच्या अटीमुळे शिक्षण आणि नोकरी मिळवण्यात अडचणी निर्माण होत असून क्रिमीलेअरची उत्पन्नाची मर्यादा तीन वर्षांहून अधिक कालावधी झाला तरी वाढण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय खात्याला ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमीलेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घ्यायचा आहे. साधारणत: दर तीन वर्षांनी उत्पन्न मर्यादा वाढवण्यात येते. १ सप्टेंबर २०१७ पासून ओबीसीसाठी क्रिमीलेअरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये आहे. २०१३ मध्ये क्रिमीलेअरसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखांवरून ६ लाख करण्यात आली होती, तर २०१७  मध्ये केंद्र सरकारने ही मर्यादा ६ लाखांवरुन ८ लाख केली. आता ती १२ लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु अद्यााप ते लागू करण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसी विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच नोकरीत देखील ओबीसी प्रवर्गातून संधी नाकारली जाते. सध्या शेतीचे आणि नोकरीतून मिळणारे उत्पन्न क्रिमीलेअरसाठी गृहीत धरले जात नाही. ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मिळत नाही. तसेच उच्च शिक्षण नसल्याने ओबीसींच्या उच्चपदस्थ जागा रिक्त आहेत. त्यामुळे किमान २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न क्रिमीलेअरसाठी गृहीत धरावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे. तसेच केंद्र सरकार वार्षिक उत्पन्नात शेतीचे उत्पन्न आणि नोकरीतून मिळणारे उत्पन्न मोजण्याचा विचार करीत आहे. मात्र त्याला विरोध होत आहे. मोदी सरकारने उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. त्याचा फटका ओबीसी विद्याथ्र्यांना बसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No increase in the creamy layer income limit abn
First published on: 07-12-2021 at 01:17 IST