बुलढाणा : गगनभेदी घोषणा, हाती बाबासाहेब आंबेडकर अन छगन भुजबळांच्या प्रतिमा, विविध संघटनाचा सहभाग, महिलांची लक्षणीय उपस्थिती अशा थाटात सिंदखेडराजा नगरीत आज सोमवारी ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला. मनोज जरांगे यांच्या जंगी सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा मोर्चा समस्त ओबीसी समाज घटकांच्या ऐक्याचे प्रदर्शन ठरला.

हेही वाचा – देशाच्या काही भागांत येत्या २४ तासांत पावसाची शक्यता! महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस? जाणून घ्या…

हेही वाचा – आता उच्च न्यायालयात ‘ऑनलाईन’ हजेरी लावता येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐतिहासिक नगरीतील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी वंदन करून रणरणत्या उन्हात निघालेला हा मोर्चा मुख्य मार्गावरून काढण्यात आला. ‘उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो’, ‘छगन भुजबळ तुम आगे बढो’ आदी घोषणा देत निघालेल्या या मोर्च्यात ओबीसी प्रवर्गातील घटक सहभागी झाले. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.