बुलडाणा : तालुक्यातील कोलवडचे तलाठी नितीन अहिर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ नागपूरच्यावतीने आज येथे धरणे आंदोलन करण्यात आले. बुलढाणा तहसील कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले.

तलाठी अहिर यांच्यावर १० ऑक्टोबर रोजी आरोपी विशाल अशोक सोनुने (रा. सागवान) याने हल्ला करून शिवीगाळ व लोटपाट केली. विशालविरुद्ध कलम ३५३, ३३२, २९४, ५०६, ३ नुसार बुलडाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक करावी व अन्य मागण्यासाठी धरणे देण्यात आले.

हेही वाचा – नागपूर : लाचखोर पोलीस हवालदारासह वेतन अधीक्षकाला अटक

हेही वाचा – नागपूरला फडणवीस, संघाचा बालेकिल्ला मानत नाही, सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले महाप्रबोधन यात्रेमागील खरे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनात अतुल झगरे, गोपाल राजपूत, रंजना पाटील, संगीता इंगळे, टेकाळे, चिंचोले, अरुणा सोनुने, रेखा वाणी, हिरालाल गवळी, प्रभाकर गवळी, अमोल सुरडकर, इतवारे, उषा देशमुख, अनुराधा लवंगे, रेश्मा चव्हाण, हुडेकर, जगताप, कांचन खरात सहभागी झाले.