नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी यवतमाळलगत जाहीर सभा आहे. त्यांच्या दौऱ्याबाबत शासकीय पातळीवर गोपनीयता ठेवण्यात आली होती. ते नागपूरहून यवतमाळला जाणार की परत येताना नागपूर मार्गे दिल्लीला जाणार याबाबत चर्चा होती. बुधवारी सायंकाळी ४:३० वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले.

हेही वाचा – सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

हेही वाचा – पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

आगमनप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यावेळी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॅाप्टरने त्यांनी यवतमाळकडे प्रयाण केले.