scorecardresearch

गडचिरोली: अंबाडीच्या भाजीतून विद्यार्थ्यांना विषबाधा; शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

२२ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले असून त्यापैकी ७ जणांना विषबाधा झाल्याचे निदान झाले आहे.

गडचिरोली: अंबाडीच्या भाजीतून विद्यार्थ्यांना विषबाधा; शासकीय आश्रमशाळेतील प्रकार
गडचिरोली : अंबाडीच्या भाजीतून विद्यार्थ्यांना विषबाधा; शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

भामरागड तालुक्यातील कोठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आला. २२ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले असून त्यापैकी ७ जणांना विषबाधा झाल्याचे निदान झाले, तर उर्वरित विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीनंतर घरी पाठविण्यात आले.

शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून निवासासोबत जेवणाचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, येथील काही विद्यार्थ्यांनी गावातील नातेवाईकांकडून अंबाडीची भाजी आणली व जेवताना मित्रांमध्ये वाटली. शाळेत गेल्यानंतर ७ विद्यार्थिनींना पोटदुखी, उलट्या झाल्याने त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले.

हेही वाचा: पंतप्रधानांच्या हस्ते फक्त समृद्धीचं नव्हे तर……

प्राथमिक तपासणीनंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळेतील १५ विद्यार्थ्यांनादेखील प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निदान झाले, तर उर्वरित १५ विद्यार्थ्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, असे भामरागडचे प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नातेवाईकांकडून आणलेल्या अंबाडीच्या भाजीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:38 IST

संबंधित बातम्या