नागपूर : चोरी करण्यासाठी दोन चोर अंधारात दबा धरून बसून असतानाच पोलिसांच्या नजरेस पडले. चोरी करण्यापूर्वीच दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनीही चोरी करण्याच्या तयारीत असल्याची कबुली पोलिसांना दिली. ही घटना सोमवारी रात्री १२.२० वाजताच्या सुमारास घडली. लोकनाथ धनराज नरांजे (४८, रा. बारसेनगर, भानखेडा, पाचपावली) आणि दिनेश रामलाल बावणे (३१, रा. ढोलसर, सरांडी ता. लाखांदुर, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – शासकीय कार्यक्रमात ‘तंत्रमंत्र’साठी विशेष व्यवस्था, नागपुरातील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात भटजी सांगताहेत लोकांचे भविष्य

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

हेही वाचा – पब-बारमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द, नागपूर पोलीस आयुक्तांचे आक्रमक धोरण

सोमवारी रात्री १२.२० वाजता धंतोली ठाण्यातील बिट मार्शल प्रदीप मोहे व हरीष जवाजी हे गस्त घालत असताना त्यांना पाहून दोन व्यक्ती गोरक्षण जवळील फुटपाथवरील पानठेल्याच्या आडोशाला लपले. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात एक लोखंडी आरी, दोन आरी-ब्लेड, एक छोटा चाकू, पेंचीस, मेनबत्ती, ८ वाहनांच्या चाव्या तसेच पर्समध्ये संतोष राजू टोंग या नावाचे आधारकार्ड व दोन एटीएम आढळले. दोन्ही आरोपी शस्त्रासह चोरी किंवा जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आढळल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.