चंद्रपूर :  जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १२ कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय रणधुमाळीला सुरुवात होत आहे. १२ बाजार समितीच्या २१६ जागांसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी ८२९ नामांकन दाखल केले. बुधवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर २८ एप्रिल २०२३ रोजी मतदान होणार आहे.

भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांनसोबत सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढविल्या असून विजयासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> शाळांना सुट्टी केव्हापासून? माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी केले जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूर, मूल ब्रह्मपुरी, भद्रावती, राजुरा, कोरपना, पोंभुर्णा, गोंडपिपरी, नागभीड,सिंदेवाही, चिमूर, वरोरा या १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली. त्यामुळे सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत. यंदाच्या निवडणुकीत सरपंच व सदस्यांना मतदानाचा हक्क दिल्याने बाजार समित्यांचे राजकारणात धक्कादायक बदल दिसून येत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी मतदारांची अंतिम यादी जाहीर केल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरपंच व सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असल्याने काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे.