प्राध्यापकांचे वेतन, कामांचे तास याबद्दल नेहमीच विविध चर्चा सुरू असतात. मात्र यवतमाळ येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्याच संस्थाध्यक्षांविरुद्ध आर्थिक शोषणाचा आरोप करून आंदोलन सुरू केले आहे. आर्थिक आणि मानसिक छळाविरुद्ध प्राध्यापकांनी ऐन परीक्षेच्या कालावधीत आंदोलनाचे हत्यार उपसल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मास्टर प्लॅन! धाडसी बँक दरोडा आणि एक चूक…

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष विनायक दाते यांनी प्राध्यापकांच्या स्थाननिश्चिती वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवल्यामुळे प्राध्यापकांचे नुकसान होत असल्याचा आरोप आहे. येथील संस्थेचा वाद सहायक धर्मादाय आयुक्त यवतमाळ यांच्याकडे न्यायप्रविष्ट व प्रलंबित असताना विनायक दाते बेकायदेशीरपणे महाविद्यालयाच्या प्रशासनात हस्तक्षेप करत असून प्राचार्य व प्राध्यापकांना निलंबित करण्याचा नोटीस देत आहेत, चौकशी समिती बसवत आहेत आणि या माध्यमातून आर्थिक शोषण करीत आहेत, असा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. विनायक दाते यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत आणि महाविद्यालयावर तत्काळ प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशी आंदोलक प्राध्यापकांची मागणी आहे. या धरणे आंदोलनास नुटा जिल्हाध्यक्ष डॉ.विकास टोणे, सचिव डॉ. राजेंद्र भांडवलकर, प्रा.डॉ.सागर जाधव, प्रा. भगत, डॉ. प्रदीप राऊत, डॉ. सुनिल ईश्वर, डॉ.शशिकांत वानखडे यांनी भेट दिली. या शोषणाविरोधात जिल्हाभर आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी प्राध्यापकांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by professors of babaji date college of arts and commerce at yavatmal regarding salary and working hours of professors nrp78 amy
First published on: 25-02-2023 at 12:04 IST