वर्धा : कारंजा येथे विकास कामांसाठी दिलेला निधी आर्वी येथे वळता करण्याची आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यामुळे कारंजावासी संतप्त झाले आहेत. चौकात जाहीर फलक लावून त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

कारंजा गावाने तुम्हास साडे बाराशे मतांचे आधिक्य दिले.तरी आम्हास दिलेला निधी तुम्ही परत मागत असल्याने तुम्हाला आमदार राहण्याचा अधिकार नाही.कारंजा शहराचा विकास खुपत असेल तर आपण तात्काळ राजीनामा द्या. वय झाले असेल तर निवृत्ती घ्या व घरी बसा,असा तळतळाट या फळकातून व्यक्त झाला आहे.

हेही वाचा >>>दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही जनतेवर अन्याय करता,हे सहन केल्या जाणार नाही असेही निक्षून सांगण्यात आले आहे. आर्वी मतदारसंघात आर्वी,आष्टी व कारंजा हे तीन तालुके येतात.या तीनही साठी सुमित वानखेडे यांनी भरघोस निधी दिला आहे.त्याचा विरोध आमदार केचे करतात.