बुलढाणा : मोफत रुद्राक्ष वाटप असे नुसते म्हटले की थेट मध्यप्रदेश मधील सिहोर हे ठिकाण आणि रुद्राक्ष वाटप प्रसंगी तिथे उडालेला गोंधळ आठवतो. त्यासाठी बुलढाण्यासह महाराष्ट्रातून गेलेल्या भाविक महिलांच्या कटू स्मृती जाग्या होतात. या स्मृती लयास जात असताना आता जिल्ह्यातील खामगाव येथील एका देवस्थानाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

खामगाव शेगावच्या सीमेवर असलेले धन कुबेर मंदिर तसे फारसे परिचित नाही. मात्र, तिथे मोफत रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आल्यावर हे मंदिर एकदम चर्चेत आले आहे. काल मंगळवारी सुरू झालेले रुद्राक्ष वाटप आज देखील सुरू आहे. मंगळवारप्रमाणेच आजही जिल्हाभरातून भाविकांनी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी केली. यामध्ये भाविक महिलांची संख्या लक्षणीय होती. अय्याजी धाम येथील धनकुबेर मंदिराच्या वर्धापन उत्सवानिमित्ताने यज्ञ, महाप्रसाद यासह मोफत रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

VEDIO :

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मराठी नववर्षाचे स्वागत, म्हणाले…

लाखांवर रुद्राक्ष वाटपाचे उद्दिष्ट

एक लाख एक हजार एकशे अकरा रुद्राक्ष नि:शुल्क वाटण्याचे लक्ष्य असल्याचे धनकुबेर मंदिराचे विश्वस्त देवइंद्र नागेश्वर महाराज यांनी प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना सांगितले. एका रुद्राक्ष शिवाय १०८, ५१, २१, ११ रुद्राक्ष असलेल्या माळांचा वेगळा स्टॉल असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या दिवशी दहा हजारांवर महिला व भाविकांनी मंदिराला भेट दिल्याचा अंदाज त्यांनी बोलून दाखवला. आज गुढीपाडव्याला कालच्या तुलनेत भाविकांची जास्त गर्दी जमल्याचे वृत्त आहे. आश्रमाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला.

दक्ष राहणे आवश्यक

हा उपक्रम धार्मिक असला तरी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने दक्ष राहणे आवश्यक ठरते. सिहोरमधील चेंगराचेंगरी आणि झालेले अनर्थ लक्षात घेता जिल्हाधिकारी एच.पी. तुम्मोड व पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी ‘अलर्ट’ राहणे अपेक्षित आहे. याशिवाय मंदिर व्यवस्थापनाने देखील आवश्यक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.