नागपूर: राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटीला गेलेले छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना संधी मिळेल काय याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारात चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी रिपब्लकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) मंत्रिपद दिल्यास त्यांच्या महायुती आणि एनडीएला फायदा असल्याचे सांगितले. आठवले आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, आरपीआयला एक मंत्रिपद आणि दोन महामंडळाचे अध्यक्षपद द्यायला पाहिजे. २०१२ पासून आम्ही भाजपसोबत आहोत. भाजपला शिवसेना सोडून गेली, पण आम्ही सोबत राहिलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उमुख्यमंत्री झाले. त्यावेळेला चर्चा झाली होती. आरपीआयला एक मंत्रिपद मिळावे कारण, फडणवीस सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रिपद होते. भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतरही आम्ही सोबत राहिलो. त्यामुळे आरपीआयचा सत्तेत सहभाग असायला हवा. आरपीआय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आहे. त्याच्या आणि गावगावात शाखा आहेत. किती खासदार, आमदार, नगरसेवक आहेत हे महत्वाचे नाही.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Vijay Vadettiwars challenge to Dharmaraobaba Atram
“भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे दिल्यास राजकारण सोडणार, अन्यथा तुम्ही सोडा,” विजय वडेट्टीवार यांचे धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
If Chhagan Bhujbal will get nomination then its danger for mahavikas aghadi warn by the sakal Maratha samaj
भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास महायुतीला सर्वत्र धोका, सकल मराठा समाजाचा इशारा

हेही वाचा… आता उच्च न्यायालयात ‘ऑनलाईन’ हजेरी लावता येणार

बरेचसे बौद्ध, दलित मतदार भाजपच्या बाजूने वळवण्यात आम्हाला यश आले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि राज्यातील महायुतीच्या सरकार पाठिंबा देण्याची भूमिका आमच्या समाजातील लोकांची आहे. त्यामुळे आरपीआयला मंत्रिमंद देणे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या फायद्याचे आहे. जे.पी. नड्डा यांना एकदा भेटून सत्तेत सहभागी करण्याबद्दल चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.