नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या (वंचित) कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षाच्या लहान गटांना भारतीय रिपब्लिकन पक्षात (आठवले) घेऊन आमच्या पक्षाची ताकद वाढवली जाईल, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी दिली.

नागपुरातील रविभवन येथे सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. वंचितचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील असे वाटत नाही. परंतु, वंचितचे राज्यातील विविध भागांतील कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश घेत आहेत. खोब्रागडे गटातील नेते आणि माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत. ते सतत संपर्कात असून त्यांनाही पक्षात येण्याचे आवाहन केले जाईल. लहान गट व नेते आमच्यासोबत आल्यावर आमच्या पक्षाची ताकद वाढेल. रा. सू. गवई यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई हेही आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत करू. महाविकास आघाडीने त्यांना काही दिले नाही. येथे आल्यावर काहीतरी मिळेल. मी स्वत: शिर्डीतून लोकसभा लढण्यास इच्छुक आहे. त्यामुळे शिर्डीसह राज्यात लोकसभेच्या दोन तर देशाच्या इतर भागांतील मिळून एकूण १० जागा आमच्या पक्षाकडून भाजपाला मागण्यात आल्या आहेत. तर राज्यात विधानसभेच्या १० ते १५ जागांची आमची मागणी असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.

rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
cm eknath shinde
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; भाजपच्या दबावामुळे उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता

हेही वाचा – पदभरतीसाठी लूट सुरूच; सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्याची घोषणा हवेतच!

हेही वाचा – ‘क्रीडा दंतचिकित्सा’मध्ये देशातील पहिला फेलोशिप अभ्यासक्रम नागपुरात, राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष

शिर्डीजवळच्या एका गावात चार दलित तरुणांना चोरीच्या कारणावरून उलटे लटकवून मारहाण झाली. हा गंभीर प्रकार असून या विषयावर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करणार आहे. मी लवकरच या गावात जाऊन तरुणांची भेट घेणार असल्याचेही आठवले म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे कुणीही संविधान बदलण्याची भाषा करणे योग्य नाही. परंतु, गरज पडल्यास त्यात नवीन कायदे करता येत असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी भूपेश थुलकर, डॉ. पुरण मेश्राम, राजन वाघमारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.