नागपूर : केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने बुधवारी नवीन रामसर स्थळांची घोषणा केली. त्यामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता ६४ झाली आहे. देशातील एकूण पाणथळ क्षेत्रापैकी सुमारे दहा टक्के क्षेत्रफळ आता रामसर पाणथळ प्रदेशात आहे. या नव्या दहा स्थळांमध्ये तामिळनाडू राज्यातील सहा तसेच गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि ओडिशामधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

२०१२ पर्यंत भारतात २६ रामसर स्थळे होती. गेल्या दशकात त्यात मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात पाच नव्या रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली होती. यात तामिळनाडूतील करिकिल्ली पक्षी अभयारण्य, पल्लीकारणाई मार्श राखीव वन, पिचावरम कांदळवन, मध्यप्रदेशातील सख्या सागर, मिझोराममधील पाला पाणथळचा समावेश आहे. भारतात १९ प्रकारच्या पाणथळ जमिनी आहेत. गुजरातमध्ये त्याचे सर्वाधिक क्षेत्रफळ असून त्यानंतर आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पाणथळ जागा स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाची आहे. कोरल रीफ, सीग्रास बेड आणि खारफुटी या तीन वेगवेगळय़ा तटीय परिसंस्थांनी संपन्न असलेले मन्नारचे आखात हे सागरी जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून जगातील सर्वात श्रीमंत प्रदेशांपैकी एक मानले जाते. तसेच जागतिक महत्त्व असलेल्या अद्वितीय सागरी विविधतेसाठी ओळखले जाते. कुंथनकुलम पक्षी अभयारण्य ही एक महत्त्वपूर्ण मानवनिर्मित पाणथळ जमीन आहे. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील नांगुनेरी तालुक्यात स्थित असलेले हे अभयारण्य दक्षिण भारतातील रहिवासी आणि स्थलांतरित पाणपक्षी प्रजननासाठी सर्वात मोठे राखीव क्षेत्र आहे. ओडिशातील महानदी नदीवरील सातकोसिया घाटी ही फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या विविध लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समृद्ध परिसंस्थेचे वैभव आहे.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

रामसर दर्जा म्हणजे?

१९७१ मध्ये इराणमधील रामसर शहरात एक परिषद झाली. त्यात जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. या आराखडय़ानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिकदृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’  घोषित करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाडय़ा, समुद्र किनारे आदी जागांचा समावेश होतो.

’तामिळनाडू : कूथनकुलम पक्षी अभयारण्य, मन्नार मरीन बायोस्फीअर संवर्धन, वेंबन्नूर पाणथळ कॉम्प्लेक्स, वेल्लोडे पक्षी अभयारण्य, वेदांतंगल पक्षी अभयारण्य, उदयमरथडपुरम पक्षी अभयारण्य

  • ओडिशा : सातकोसिया घाट.
  • गोवा : नंदा तलाव.
  • कर्नाटक : रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य.
  • मध्यप्रदेश : सिरपूर पाणस्थळ.