अमरावती : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्‍य आता जगभरातील वाचकांना संकेतस्‍थळाच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध झाले आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या जनसंपर्काचे कामकाज पाहणाऱ्या एका कंपनीने हे संकेतस्‍थळ विकसित केले आहे.

संकेतस्थळाचे अनावरण अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई बोंडे व सर्वाधिकारी लक्ष्मण गमे यांच्या हस्ते गुरुकुंज आश्रम येथे करण्यात आले.

हेही वाचा – चंद्रपूर: ताडोबाचे मुख्य आकर्षण काळा बिबट्या; पर्यटकांना मनसोक्त दर्शन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुमारे पाच हजार प्रकारची गद्य व पद्य प्रकारच्या विशाल ग्रंथसंपदेची रचना केली. त्यामध्ये खास करून ग्रामगीता, मेरी जापान यात्रा, अंभगगाथा, लहरकी बरखा, श्रीगुरुदेव मासिक, आदेश रचना इत्यादी ग्रंथसंपदेचा समावेश आहे. http://www.Tukdojimaharaj.com या संकेतस्थळावरून एका क्लिकवर आता महाराजांचे साहित्य उपलब्‍ध होऊ शकेल. त्याचबरोबर १९४४ मध्‍ये तुकडोजी महाराजांनी गोरगरीबांसाठी स्थापन केलेल्या श्रीगुरुदेव आयुर्वेद रसशाळेची औषधीसुद्धा यांच संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहे.

या संकेतस्थळाच्या निमिर्तीची संकल्पना द पीआर टाईम्स लिमिटेडचे संचालक निखीलेश सावरकर, कंपनीच्या माध्यम व जनसंपर्क संचालिका भूमिता सावरकर यांची आहे. कंपनीचे निशांत मल्होत्रा, अमित बोरकर, स्वप्नील भोगेकर, रोहीत अतकरे, प्रतीक घोगले, सृष्टी पटेल, स्‍वप्निल डोंगरवार यांनी हे संकेतस्‍थळ विकसित केले आहे.

हेही वाचा – बुलढाणा: ‘ते’ वृत्त कळताच जिल्हाध्यक्ष काझींंचा प्रवासादरम्यान राजीनामा

संकेतस्थळाच्या औपचारीक अनावरणा प्रसंगी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचारप्रमुख प्रकाश वाघ, सेवाश्रम समिती प्रमुख डॉ. राजाराम बोथे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम पाळेकर, दिलीप कोहळे, सुशील वणवे, डॉ. दिगंबर निघोंट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संदेशाची प्रेरणा घेत ‘द पीआर टाईम्स लिमिटेड’ या कंपनीने संकेतस्‍थळ विकसित केले आहे. सेवा म्हणून ही कंपनी संकेतस्थळाची कायम हाताळणी, देखभाल व दैनंदिन कार्यचलन मोफत करणार आहे. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, सेवाश्रम समिती प्रमुख डॉ. राजाराम बोथे व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या प्रसिद्धी विभागाचे संयोजक राजेश बोबडे यांनी या कार्याला विशेष सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया निखिलेश सावरकर यांनी दिली.